"भाजप आणि MIM च्या युतीवरून काँग्रेसने डागली तोफ" म्हणाले, " भाजप MIM ची..."



AIMIM आणि भाजप यांनी अकोट नगर परिषदेत युती करण्या वरून काँग्रेस ने समाज माध्यमां वरून टीका केली आहे. 



Congress Criticises BJP AIMIM Alliance :- 



राजकारणात कुणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो अशी एक जुनी म्हण आहे. ते सत्यात उतरताना अनेकदा आपण बघितले असेलच. असेच अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदेत सत्तेत बसण्यासाठी भाजप आणि MIM यांनी युती केली होती. त्यावरून महाराष्ट्र काँग्रेसच्या एक्स हॅण्डल वरून भाजपचे रावसाहेब दानवे आणि MIM चे इम्तियाज जलील यांचा व्हिडिओ पोस्ट करत तोफ डागली आहे. भाजप आणि MIM ची युती असे त्यांनी व्हिडिओला कॅप्शन दिले. 








          संबंधित व्हिडिओ फार जुना असून, MIM प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आणि भाजपचे रावसाहेब दानवे यांच्या एकत्रित पत्रकार परिषदे दरम्यानचा आहे. "भागवत कराड किंवा भाजपचा कोणीही उमेदवार असो. भाजपला जिंकून आणण्यासाठी आम्हाला इम्तियाज जलील यांना उभे करावे लागते", असे रावसाहेब दानवे व्हिडिओ मध्ये बोलताना दिसत आहेत. 

        रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्या वर MIM चे इम्तियाज जलील यांनी बाजूला बसून, हसत हसत ऐकत होते. त्यावर इम्तियाज यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. 

             काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षात सुद्धा अशीच बंडखोरी पहायला मिळाली. अंबरनाथ नगर परिषदेत भाजप आणि काँग्रेस मध्ये युती झाल्याचे पहायला मिळाले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या युतीचा निषेध नोंदवला आणि त्या सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. 


 अकोट नगर परिषदेत झालेल्या युती वरून इम्तियाज जलील यांनी तीव्र नाराजी दर्शवली होती. युती करणाऱ्या सर्वांवर कारवाई केली जाईल, असे इम्तियाज जलील पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले होते. नंतर AIMIM पक्षाने भाजप सोबत जाण्याचा निर्णय मागे घेतला होता. तसे पत्रक समाज माध्यमांवर पोस्ट शेअर केला होता. 




या युतीवर आमची भूमिका स्पष्ट असून, कुठल्याही परिस्थिती मध्ये आम्ही MIM पक्षा बरोबर युती करणार नाही. तत्काळ ती युती तोडण्याचे आदेश दिले आहे. अकोट मधील आमदार यांना नोटीस बजावली असल्याचा खुलासा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या