राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी DGCA कडे मागणी केली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी अजित पवारांच्या अपघाती निधनावर शंका व्यक्त केली.
MLC Amol Mitkari Demands DGCA :-
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यावरून अनेक राजकीय पुढाऱ्यांनी शंका व्यक्त करण्यास सुरुवात केली. आता या अपघात बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठी मागणी अधिकृत एक्स हॅण्डल वरून केली आहे.
![]() |
| Photo Source Amol Mitkari Instagram Account |
काय केली मागणी?
"DGCA ने ब्लॅक बॉक्सची सत्य पडताळणी अहवाल जाहीर करण्या पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे २८ जानेवारी २०२६ चे मुंबई विमानतळ मधील मुख्य प्रवेश दारा पासून ते विमानात बसण्या पर्यंतचे सर्व व्हिडिओ शूटिंग व सीसीटीव्ही फुटेज अधिकृत रित्या प्रसिद्ध करावी", अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
DGCA नी ब्लॅक बॉक्स ची सत्यपडताडणी अहवाल येण्याअगोदर आदरणीय अजित दादांचे दिनांक २८ जानेवारी २०२६ चे मुंबई विमानतळ मुख्य प्रवेशद्वारापासून ते विमानात बसेपर्यंतचे सर्व व्हीडीओ शुटिंग व CCTV फुटेज तत्काळ अधिकृतरित्या तात्काळ प्रसिद्ध करावे.@DGCAIndia
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 3, 2026
काही दिवसांपूर्वी आमदार अमोल मिटकरी यांनी ६ जण विमानात असताना ५ जणांचा मृत्यू कसा काय?, Take Off आधी प्रवासी यादी डिजिटली नोंदलेली असते, मग विसंगती का ?, एखादाही कागदाचा तुकडा का जळलेला दिसत नाही, इतक्या वेळा पायलट का बदलले गेले? असा सवाल उपस्थित एक्स वरून उपस्थित केला होता.
तर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी अजित पवार यांच्या अपघाती निधन वर शंका उपस्थित केली होती. त्यांनी विचारले "विमान 8 वाजता असताना कॅप्टन मदन आणि कॅप्टन यश ट्रॅफिक मध्ये अडकणे, दोघांचा एकाच वेळी उशीर, अचानक पायलट बदल आणि त्यानंतरची सेफ्टी प्रक्रिया या सर्व बाबींची सविस्तर व पारदर्शक माहिती सार्वजनिक का नाही? हा अपघात की घातपात असे म्हणत शंका त्यांनी व्यक्त केली."
विमानात किती प्रवासी होते याचा खुलासा स्वतः DGCA कंपनीने केला होता. विमानात एकूण ५ प्रवासी प्रवास करत होते असा खुलासा DGCA कंपनीने केला. त्यामध्ये अजित पवार यांचाही समावेश होता. विमानातील एकूण पाचही जणांचा मृत्यू अपघातात झाला.
मेसर्स वीएसआर वेंचर्स प्राइवेट लिमिटेड का लीयरजेट 45 विमान (VT-SSK) बारामती हवाई अड्डे पर दुर्घटनाग्रस्त pic.twitter.com/TklYlD3Jx8
— DGCA (@DGCAIndia) January 28, 2026

0 टिप्पण्या