एक व्हिडिओ समाज माध्यमांवर वायरल झाला आहे. ज्यामध्ये युवक गंगा नदी मध्ये दूध विसर्जन करताना दिसत आहे. मुली त्याला दूध मागायला गेल्यावर तो चक्क त्यांना नकार देतो.
Viral Video :-
सध्याचे युग समाज माध्यमाचे आहे. त्यावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एका युवकाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. गेल्या दोन तीन दिवसां पासून व्हिडिओ समाज माध्यमांवर धुमाकुळ घालत असून, सदर व्हिडिओ माणुसकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे की, एक युवक गंगेत दूध विसर्जन करताना दिसत आहे. त्याच्या सभोवतालच्या लहान मुली त्याच्या कडे दूध मागायला येतात. परंतु, तो त्यांना दूध न देता. त्यांच्या कडे पाठ फिरवतो आणि संपूर्ण दूध नदीत विसर्जन करतो. वायरल व्हिडिओ मध्ये तीन लहान मुली दिसत आहेत.
वायरल व्हिडिओ मधील व्यक्तीवर नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. एकाने म्हटलं, "गंगेत विसर्जित करण्यापेक्षा गरीब मुलां मध्ये वाटप केलं असतं. तर, जास्त पुण्य मिळालं असतं". एक जण म्हणतो,"कुणी तरी या थांबवा व्यक्तीला. पुढे एक लहान मुलगी दुधाच गंज घेऊन उभी असताना अंधविश्वास म्हणतोय दूध पाण्यात विसर्जित केल्याने पुण्य मिळेल". एक जण लिहितो, "गंगा मैय्या सर्व काही बघतेय".
वायरल व्हिडिओ @Abhimanyu 1305 एक्स हॅण्डल वरून पोस्ट करण्यात आला आहे. सदर व्हिडिओ आता पर्यंत 730 K लोकांनी बघितला. आता पर्यंत व्हिडीओला 7,299 लोकांनी पसंती दर्शवली आहे.
एक श्रद्धालु गंगा जी में दूध विसर्जन कर रहा है वहीं कुछ गरीब बच्चियां अपने बर्तन लेकर आईं और दूध लेने लगीं। लेकिन.... pic.twitter.com/nvW2zTWo35
— Abhimanyu Singh (@Abhimanyu1305) January 21, 2026
0 टिप्पण्या