एसटी च्या मद्यपि कर्मचाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे परिवहन मंत्री व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी निर्देश दिले.
MSRTC Driver Drinking on Duty :-
एसटीच्या कर्मचाऱ्यां करिता महत्त्वाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांना आता कर्तव्या वर असताना मद्यपान करता येणार नाही आहे. कर्तव्यावर असताना मद्यपान केल्यास कर्मचाऱ्यांवर आता तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.
![]() |
मुंबई च्या परळ येथील बस स्थानकाला दिलेल्या भेटी दरम्यान चालक आणि वाहकांच्या विश्रांतीगृहाची त्यांनी पाहणी केली असता त्यांना त्याठिकाणी देशी दारूच्या बऱ्याच लहान बॉटल आणि कर्मचाऱ्यांकडून मद्यपान केल्याची दुर्गंधी येत असल्याचे आढळले. त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले.
मद्यपान करून कर्तव्यावर रुजू होणारा कर्मचारी केवळ अपघाताला कारणीभूत ठरत नसून, एसटीच्या सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासावरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. त्यामुळे अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांना चौकशीअंती सेवेतून बडतर्फ केले पाहिजे, असेही मंत्री सरनाईक म्हणाले.
"एसटी चे सुरक्षा, दक्षता खाते आणि संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने कर्मचाऱ्यांना मद्यपान करण्यास खतपाणी मिळते. त्यामुळे संबंधित दक्षता व सुरक्षा अधिकाऱ्यांची विभागीय चौकशीअंती कठोर कारवाई करण्याचे" निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
"कर्तव्यावर जाणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची, चालकांची ब्रेथ ॲनालायझर द्वारे चाचणी अनिवार्य करावी. चाचणीत दोषी सिद्ध झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याचे" निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
🗓️ २५ जानेवारी २०२६ | 📍परळ
— Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) January 25, 2026
कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटीच्या चालक व इतर कर्मचाऱ्यांबाबत कोणतीही तडजोड न करता तातडीने निलंबित करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत.
आज मुंबईतील परळ बसस्थानकाला दिलेल्या अचानक भेटीदरम्यान चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांची पाहणी केली. यावेळी… pic.twitter.com/rsyGXrvGaQ

0 टिप्पण्या