भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण! "सागर गोरखे रमेश गायचोर यांना मुंबई उच्च न्यायालय कडून जामीन मंजूर"


    

      भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील दोन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने जामीन मंजूर झाला आहे. अद्याप फक्त एका आरोपीला जामीन मंजूर झालेला नाही. 

 


Bhima Koregao Case  :- 



2018 साली घडलेल्या भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मोठी घडामोड समोर येत आहे. मुंबई उच्च न्यायालय कडून कबीर कला मंचाचे कार्यकर्ते सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने दोघांचा जामीन मंजूर केला. 







         न्यायाधीश ए एस गडकरी आणि श्याम चांडक यांच्या खंडपीठाने हा जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती ए.एस. गडकरी आणि एस.सी. चांडक यांच्या खंडपीठाने विशेष एनआयए न्यायालयाने २०२२ मध्ये दिलेल्या आदेशा विरुद्ध गोरखे आणि गैचोर यांनी दाखल केलेली अपील मंजूर केली. त्या अर्जावर सुनवाई करताना न्यायालयाने या प्रकरणात त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. 

गोरखे आणि गैचोर यांना प्रत्येकी १ लाख रुपयांच्या जामिनाची रक्कम जामीनदारासह भरावी लागेल आणि दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी एनआयएच्या मुंबई कार्यालयात हजर राहावे लागेल.

      .

              

        राष्ट्रीय तपास संस्थेद्वारे (एनआयए) त्यांच्यावर बेकायदेशीर कृत्य केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. त्यामुळे दोघांवर सुद्धा UAPA कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. कबीर कला मंचाचे सदस्य सागर गोरखे, रमेश गायचोर आणि ज्योती जगताप यांना २०२० सालीच राष्ट्रीय तपास संस्था (NIA) तर्फे अटक करण्यात आली. 

       

  काही महिन्या पूर्वीच या प्रकरणाशी संबंधित आरोपी हनी बाबू यांना बॉम्बे उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तर, ज्योती जगताप यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. या प्रकरणातील आरोपी वकील सुरेंद्र गडलिंग आजही तुरुंगात आहेत.

   

     भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात 16 आरोपींना अटक करण्यात आली होती. सुरुवातीला 2018 साली 9 आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली. कालांतराने 7 आरोपींना राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने अटक केली. त्यापैकी 1 आरोपी स्टॅन स्वामी यांची तुरुंगात असताना मृत्यू झाला. 

      


     


             

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या