भाजप MIM युती वरून वंचितचा MIM वर तिखट प्रहार, म्हणाले, "इम्तियाज जलीलांचा खरा भगवा रंग"



अचलपूर नगरपरिषदेत आज सत्तास्थापन करण्यासाठी कट्टर हिंदुत्ववादी भाजपने चक्क MIM पक्षाशी युती केली. त्यावरून वंचित बहुजन आघाडीने MIM प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना चांगलेच सुनावले आहे. 



BJP AIMIM Alliance :- 


  राजकारणात कोणीच एकमेकांचा कायमचा शत्रू नसतो, अशी एक जुनी म्हण आहे. याचा प्रत्यय आधी अकोट नगर परिषद मध्ये आणि आता अचलपूर मध्ये आला. अचलपूर नगर परिषद मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी कर्मठ हिंदुत्ववादी पक्ष भाजपा आणि MIM एकत्र आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. त्यावरून आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अधिकृत एक्स अकाउंट वरून तिखट प्रहार केला. 








              भाजप MIM युती वरून वंचितने AIMIM चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. "इम्तियाज जलीलांचा भगवा रंग" असे वंचितने संबोधले असून, MIM चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना या युतीला तुमचे परवानगी आहे का? असा सवाल केला. 



               युसुफ पंजाणी यांचे युतीवर भाष्य


"MIM आणि भाजप ची युती झाल्याची बातमी ही पूर्णपणे निराधार आहे. MIM ची वाढत चाललेल्या ताकदीला शह देण्यासाठी पक्षाच्या बदनामीचे कारस्थान सुरू आहेत", असे MIM चे प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पंजाणी म्हणाले. 



             यापूर्वी सुद्धा MIM ने अकोला जिल्यातील अकोट नगर परिषद मध्ये भाजपशी सत्तास्थापन करण्यासाठी हातमिळवणी केली. या युती वरून विरोध सुरू झाल्यानंतर MIM ने दिलेलं समर्थन मागे घेतलं. तसं पत्रक उप-प्रदेशाध्यक्ष युसुफ पंजाणी यांच्या नावाने जारी करण्यात आले. 


 AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष ओवेसी यांनी या युती वर भाष्य करताना म्हणाले की, "समुद्राचे दोन किनारे कधीच एकत्र येऊ नाही शकत. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार यांच्या सोबत पक्षातील कुणीही युती केल्यास त्यांच्यावर पक्षा तर्फे कारवाई करण्यात येईल". 


         

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या