जरुरी कामानिमित्त कुठे गेले आणि आधार कार्ड सोबत नाही घेतले तर आता तणावग्रस्त होण्याची गरज नाही. जाणून घ्या प्रोसेस.
How to Download Aadhar Card :-
आधार कार्ड आपल्या उपयोगातील सर्वात महत्त्वाचा भाग झालेला आहे. आपण कधी न कधी कुठल्या न कुठल्या कामा निमित्त घराबाहेर पडत असतो. अचानक आपल्याला आठवते की महत्त्वाचा कागद पत्रातील एक आधार कार्ड आपण सोबत घेतलेलं नाही. त्यामुळे आपण अजून तणावग्रस्त होत असतो. आता तणावग्रस्त व्हायचं कारण नाही.
आधार कार्ड आपल्याला सरकारी संस्था किंवा खाजगी संस्था मध्ये काम पडत असते. त्यामुळे ते आता सर्वात महत्त्वाचं झालेलं आहे. त्याच्याशिवाय कामात अडथळा निर्माण होत असतो.
![]() |
Photo Source Mint Media Company |
आजकाल लहनां पासून तर मोठ्यां पर्यंत सगळ्या कडे मोबाईल हा असतोच. याच मोबाईल मध्ये व्हॉट्स ॲप नावाचं ॲप्लिकेशन मोबाईल मध्ये असतोच. त्यामुळे या व्हॉट्स आप वरून आता तुम्ही आधार कार्ड डाऊनलोड करू शकणार आहात.
कसे कराल प्रोसेस ?
सर्वात अगोदर MyGov helpdesk च्या अधिकृत नंबर +91 90131 51515 मोबाईल मध्ये सेव करा. त्यानंतर या नंबर वर Hii किंवा Hlo मेसेज करा. तुम्हाला त्या नंबर वर मेसेज येईल. तिथं तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील. त्या ऑप्शन मध्ये Digilocker चा ऑप्शन तुम्हाला निवडावा लागेल. जर तुमचा Digilocker अकाऊंट आधीपासूनच तयार असेल, तर सरळ त्यामध्ये तुमचा आधार नंबर टाकावा. तुमच्या मोबाईल वर एक ओटीपी येईल त्याला Chat मध्ये टाका. ही प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर तुमच्या Digilocker मध्ये Save असलेल्या सर्व कागदपत्रांची लिस्ट तुमच्या व्हॉट्स ॲप वर तुम्हाला मिळेल. लिस्ट मधून आधार कार्ड वर क्लिक करून डाऊनलोड करून घ्या.
ही सर्व प्रक्रिया करण्या अगोदर तुम्हाला स्वतः च Digilocker अकाऊंट आहे की नाही याची खात्री करून घ्यायची आहे. नसेल, तर Digilocker संकेतस्थळाला भेट देऊन किंवा ॲप्लिकेशन मोबाईल मध्ये डाऊनलोड करून अकाउंट तयार करून घ्यायचं आहे.
0 टिप्पण्या