Monsoon Update :-
देशात सध्या पावसाचे वातावरण असून, राज्यातील काही भगात सुद्धा पावसाने थैमान घातले आहे. अशातच हवामान विभागाने विदर्भासाठी ५ दिवसाचा इशारा सांगितला आहे. २७ सप्टेंबर ते ३१ ऑगस्ट असा ५ दिवसांचा इशारा दिलेला आहे. २७ ऑगस्ट रोजी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता संपूर्ण विदर्भात वर्तवली आहे. या दिवशी संपूर्ण विदर्भाचा समावेश हवामान विभागाने पिवळ्या झोन मध्ये केले आहे. यातून वाशिम जिल्ह्याला सावधानतेचा इशारा दिलेला आहे. भारत हवामान विभागाच्या नागपूर केंद्राने हा इशारा दिला आहे.
पूर्व विभागातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि पश्चिम विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात पाऊस आणि विजेच्या कडकडाटा सह वादळ आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता २८ ऑगस्ट रोजी हवामान विभागाने वर्तवली आहे. तर, अमरावती, अकोला, वाशिम, आणि बुलढाणा या जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे. संपूर्ण विदर्भ पिवळ्या झोन मध्ये समावेश करण्यात आला आहे.
विदर्भातील अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागांत विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार सरी बरसण्याची २९ ऑगस्ट रोजी शक्यता आहे. यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांना धोका नाही असे हवामान विभागाने सांगितले आहे. बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ तीन जिल्हे हिरव्या झोन मध्ये असणार आहे. तर उर्वरित जिल्ह्यांचा पिवळ्या झोन मध्ये समावेश करण्यात आला आहे.
चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात ३० ऑगस्ट रोजी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार सरी बरासण्याची शक्यता वर्तवली आहे. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांना धोका नाही असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या दिवशी चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पिवळ्या झोन मध्ये समावेश करण्यात आले आहेत.
संपूर्ण विदर्भाला ३१ ऑगस्ट रोजी धोका नाही असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हिरव्या झोन मध्ये समावेश या दिवशी विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
![]() |
IMD नागपूर विभागाने ही फोटो एक्स वर पोस्ट केली आहे. |
0 टिप्पण्या