Hot Posts

6/recent/ticker-posts

" कुलूप तोडण्यासाठी चोरट्याने वापरली अनोखी शक्कल " "ना हातोडी ना दगड फक्त एक इंजेक्शन आणि ... ".

 


कुलूप तोडण्यासाठी चोरट्याने अनोखी शक्कल लढवत कुलूप उघडला आहे. हे बघून बाजूचे पोलीस कर्मी आश्चर्यचकित झाले असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 


चोराने वापरली अनोखी पद्धत :-

देशात आणि राज्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. अशातच चोरटेही नवीन नवीन पद्धती चोरी करण्यासाठी आत्मसात करत असतात.  कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमासाठी घरा बाहेर पडत असतो. त्यावेळी दाराला कुलुप लावून घरा बाहेर पडत असतो. घरातील दागिने, वस्तू किंवा पैसै सुरक्षित रहावे म्हणून  घराला महागडे कुलुप लावून जातो.  परंतू, आता चोरांनीही शक्कल लढवण्यास सुरुवात केली आहे. अशातच एक युवकाचा चोरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ कुठला आहे याची अजून पुष्टी झालेली नाही. 





    व्हायरल  व्हिडिओ मध्ये चोर कुलूपात चाबी लावण्याच्या ठिकाणी इंजेक्शन ने काही प्रमाणात पेट्रोल टाकतो. नंतर काही सेकंदात लायटर ने युवक आग लावतो आणि नंतर हलका त्या कुलुपाला मारतो. नंतर तो कुलूप तुटतो. हे बघून बाजूचे पोलीस आश्चर्यचकित होतात. आश्चर्याची गोष्ट ही आहे की कुठलेही तोडफोडीचे औजारे न वापरता केवळ काही सेकंदात तो कुलूप खोलतो. 

                        

                       कुलूप कसा तोडतो


व्हायरल व्हिडिओ मध्ये चोरी करणारा युवक कुलूप ला न तोडता कसं खोलता येऊ शकतो याबद्दल खुलासा करतो की,   " कुलुपच्या आत मध्ये एक प्लॅस्टिकची पातळ थर असते ती पेट घेऊन वितळते. ज्यामुळे कुलुपाचे लॉकिंग सिस्टम अयशस्वी होते आणि कुलूप उघडतो. "


     व्हायरल व्हिडिओ मध्ये दाखवल्या ने अनेकांच्या मनात सुरक्षितते बद्दल प्रश्न निर्माण होत आहेत. काय आता कुलूप पण सुरक्षित आहे ? असा प्रश्न मनात येतोय. 

   

      



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या