Arvind Kejriwal Criticises On Congress :-
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि काँग्रेस मधील संबंध यांच्यावर बोलत असताना काँग्रेस वर जहरी टिका केली आहे. ते म्हणाले की, "आम्हाला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून तुरुंगात डांबलं. परंतु, काँग्रेस चे नेतृत्वावर नॅशनल हेरॉल्ड, आणि 2 जी घोटाळा केल्याचा आरोप असून सुद्धा त्यांना अटक केली जात नाही. काही तरी गडबड असून, काँग्रेस चा भाजप ला छुपा पाठिंबा आहे" असा आरोप करत त्यांनी काँग्रेस वर टिकास्त्र सोडले."
" तडजोडीचे राजकारण या देशात जास्त चालत नसून, पाठीमागे एखादी तडजोड केली जात असेल आणि जनतेला हे माहिती होणार नाही असं काँग्रेस ला वाटत असेल असं कधीच होत नसतं. जनतेला सर्वकाही कळत असते. काँग्रेसने सर्वात जास्त तडजोड केलेली आहे असं मला गोव्यात गेलेल्या आमच्या टीमने लोकांशी चर्चा करून सांगितले " असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला.
" आम्ही आघाडी करायला आलेलो नव्हतो. आम्ही देशासाठी आलो होतो. देशाचं राजकारण करा. परंतु, कधीच तडजोडीचे राजकारण करू नका. देशाच्या राजकारणासाठी आम्ही आमचं शिर कापून घेण्यास तयार असून, सत्तेसाठी, पक्षासाठी, परिवारासाठी आणि स्वतःसाठी कधीच तडजोड करणार नाही ", असेही केजरीवाल म्हणाले.
0 टिप्पण्या