राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भिमा कोरेगाव प्रकरण संबंधित एक पत्र लिहिलं होतं. भिमा कोरेगाव चौकशी आयोगाने उद्धव ठाकरे यांना ते पत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
भिमा कोरेगाव प्रकरण :-
भिमा कोरेगाव येथे उसळलेल्या दंगली संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना २४ जानेवारी २०२० रोजी लिहिलेले पत्र २२ सप्टेंबर पूर्वी आयोगासमोर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. स्वतःहून किंवा प्रतिनिधींना आयोगासमोर हजर करून संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे आदेश आयोगाने दिलेले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण
पुण्यातील भिमा कोरेगाव येथे २०० वर्षा पूर्वी महार सैनिक आणि बाजीराव पेशवे यांच्यात लढाई होऊन महार सैनिकांनी लढाई जिंकली होती. १-०१-२०१८ ला त्याअनुषंगाने तिथे लाखोंचा जनसमुदाय पोहचला होता. नेमकी त्याचवेळी तिथे मोठी दंगल उसळली होती. त्यालाच अनुसरून, शरद पवार यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एक पत्र लिहिले होते. " भिमा कोरेेगाव येथे घडलेला हिंसाचार हा तत्कालीन राज्य सरकार मध्ये प्रमुख असलेले देवेंद्र फडणविस यांचाच कट होता. सत्तेचा गैरवापर करत सरकारने दंगल घडवून आणली आणि दंगलीच्या सूत्रधारांना पाठीशी घालण्यात आले. असा आरोप त्यांनी या पत्रात केला होता. तसेच या प्रकरण मध्ये एस आई टी तर्फे चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती."
आयोगाने दिले आदेश
शरद पवार यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना पत्र लिहिले होते. ते पत्र भिमा कोरेगाव चौकशी आयोगाने काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना सादर करण्याचे निर्देश दिले होते. शरद पवार यांच्या वकिलांनी आयोगा समोर हजर राहून पत्र नसल्याचे लेखी सूतोवाच केले होते. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी चे प्रकाश अंबेडकर यांनी ते पत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे असेल तर त्यांच्याकडून मागून घ्यावी अशी विनंती आयोगा समोर केली होती. त्यानुसार आयोगाने उद्धव ठाकरे यांना २२ सप्टेंबर पूर्वी शरद पवार यांनी लिहिलेलं पत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
0 टिप्पण्या