भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा, म्हणाले, "विरोधात बसायला तयार, पण महापौर पद देणार नाही"

 



भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ज्यामध्ये त्यांनी महापौर पद भाजप शिवाय कोणालाही देण्यास नकार दिला आहे. 


       


 Chandrapur Mayor Post :- 



तीन दिवसांपूर्वीच राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदी कोण असणार याची चर्चा जनमानसांत रंगली आहे. महापौर पदावरून तीन मुख्य पक्षांमध्ये राजकीय युद्ध सुरू आहे. अशातच भाजपचे ज्येष्ठ नेते यांनी महापौर पदावरून मोठी घोषणा केली आहे. "विरोधात बसायला तयार असून, महापौर पद इतर कुठल्याही पक्षाला देणार नसल्याचे" आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. 







      "अनेक अपक्ष नगरसेवक आणि इतर नगरसेवक हे आमच्या संपर्कात आहेत. भाजपचा महापौर होणार असेल. तर, आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहोत असे नगरसेवकांनी सांगितले असल्याचा", खुलासा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला. 


       "शिवसेना उबाठा गट सोबत चर्चा झालेली असून, महापौर पद इतर कोणालाही देता येणार नसून, आवश्यकता असेल तर आम्ही विरोधी पक्षात बसणार आहोत", असेही मुनगंटीवार म्हणाले.

     

        "जो पक्ष शिवसेनेला (ठाकरे गट) महापौर पदावर बसवेल त्या पक्षासोबत आम्ही जाणार"अशी भूमिका शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी घेतली. त्यावरून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले. 


      काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला. या विधानावरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. 

                


        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या