आमदार रोहित पवार यांनी मतदारांच्या बोटावरील शााई मिटण्यावरून राज्य निवडणूक आयोगावर टिका केली आहे. निवडणूक आयोगाची मग्रुरी देशासाठी धोकादायक असल्याची टीका रोहित पवारांनी टीका केली आहे.
MLA Rohit Pawar Criticises State Election Commission Of Maharashtra :-
आज राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकांचा मतदान पार पडले. मतदान करण्यापूर्वी बोटाला शाई लावली जाते. त्याच शाई वरून आता वादंग निर्माण झाला आहे. "निवडणूक आयोगाची मग्रुरी सुरू असून, शाईच्या माध्यमातून लोकशाही पुसण्याचे काम सुरू असल्याची" टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
![]() |
| Photo Source The Telegraph X Account |
Conduct Of Election Rules, 1961 कायद्याचा उल्लेख करत रोहित पवारांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका केली. ते म्हणाले, "Conduct Of Election Rules 1961 कायद्याच्या अंतर्गातील 49 K मध्ये स्पष्टपणे मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांच्या बोटा वरून पुसता न येणारी शाई लावावी, असा आदेश निवडणूक आयोगाचा आहे. परंतु, निवडणूक आयोग शाईऐवजी मार्करचा वापर करत आहे. या मार्करने ओढलेली खून लवकरच पुसली जाते".
"नियम कायद्याच्या पुस्तकात लिहून ठेवायला असतात मात्र प्रत्यक्षात आम्ही करू तो कायदा ही निवडणूक आयोगाची मग्रुरी आहे. लोकशाही साठी हा प्रकार गंभीर आणि धोकादायक असून, याद्वारे लोकशाही पुसण्याचे काम सुरू आहे", असे आमदार रोहित पवार यांनी अधिकृत एक्स अकाउंट वरून म्हटले.
Conduct Of election Rules 1961 च्या नियम 49 K मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय की, मतदान करण्यासाठी आलेल्या प्रत्येक मतदाराला काढता किंवा पुसता न येणारी (indelible) शाई लावण्यात यावी. असं असताना राज्य निवडणूक आयोगाकडून मात्र शाईऐवजी मार्कर वापरण्यात येत असून त्याने केलेली खून… pic.twitter.com/OsPfprxtfp
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 15, 2026
ठाणे महानगरपालिकेतील मतदाना नंतर बोटाला लावली जाणारी शाई नेलपेंट (Nail Paint) रिमोव्हर ने पुसली जाते, असाच एक व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
वायरल व्हिडिओवर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया नोंदवली. "मतदान करत असताना बोटावर लावण्यात येणाऱ्या शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारां मध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करताना आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल", असे निवडणूक आयोगाने समाज माध्यमां वर पत्रक जारी करत म्हटले.
बोटावरील शाई पुसणे गैरकृत्य आहे. तर, सहजरित्या मिटवता येणारी शाई वापरणे कोणते कृत्य आहे? असा सवाल वरिष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी केला आहे.
🚨बोटावरील शाई पूसणे गैरकृत्य असेल तर सहजरित्या पूसली जाऊ शकेल अशी शाई वापरणे कोणते कृत्य आहे ?
— Raju Parulekar (@rajuparulekar) January 15, 2026
▪️शाई पूसून कुणी दुबार मतदान करायला आला तर कार्यवाही करण्याचा इशारा देणे ठीक. पण शाई पूसूनच परत आला/आली आहे हे कसे सिद्ध करणार❓
▪️शिवाय, आपल्या नावे कुणी दूसरी व्यक्ती मतदान करून… pic.twitter.com/ThTL6HtMPX
नागपूर महानगरपालिकेतील प्रभाग क्र. १६ मधील मतदार अमित तायडे यांनी नागपुर महानगरपालिकेचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना बोटावरील शाई मिटण्या वरून पत्र लिहीत जाब विचारला आहे. "मतदान दिल्यानंतर काही क्षणातच माझ्या बोटावरील शाई मिटली. सदरची निवडणूक ९ वर्षा नंतर पार पडत असून, अश्या पद्धतीचा कारभार होणार असेल. तर, मतदाराने प्रशासनाच्या कारभारावर आणि निवडणूक आयोगावर विश्वास कसा ठेवायचा?" असा सवाल त्याने केल.



0 टिप्पण्या