महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज" "राज्य निवडणूक आयोगाची माहिती"

 


राज्यातील महानगरपालिकेची निवडणूक उद्या 15 जानेवारी रोजी पार पडणार असून,  निवडणुकांसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले. 



Municipal Elections 2026 Maharashtra :-  


    राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणुका उद्या 15 जानेवारी रोजी पार पडणार असून, उद्या जनता त्यांचा निर्णय मतदपेटीत बंद करणार आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी निवडणुकांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असल्याचे राज्य निवडणूक निवडणूक आयोगाने सांगितले. 



Photo Source Maharashtra Election Commission X Official Account.



काय आहे मतदानाची वेळ? 


  उद्या १५ जानेवारी रोजी सकाळी ७:३० वाजे पासून ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या ठराविक वेळेतच मतदान करायचं आहे. तर, मतमोजणी सकाळी १० वाजे पासून सुरुवात करण्यात येणार आहे. 



               २८६९ जागांसाठी पार पडणार निवडणूक


२९ महानगरपालिकेच्या एकूण २,८६९ जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. तर, राज्यभरातील ३ कोटी ४८ लाख ७९ हजार ३३७ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी ३९ हजार ९२ मतदान केंद्राची व्यवस्था निवडणुकीसाठी करण्यात आली असून, ३ हजार १९६ संवेदनशील मतदान केंद्र घोषित करण्यात आली आहे. यंदाच्या निवडणूक प्रक्रियेत १५,९०८ इतके उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. 

   



      कुठल्या महानगरपालिकेच्या निवडणुका होणार? 


राज्य निवडणूक आयोगाने सार्वत्रिक महानगर पालिका निवडणुकिची घोषणा १५ डिसेंबर रोजी केली होती. त्यानुसार बृहन्मुंबई, छत्रपती संभाजी नगर, नवी मुंबई, वसई-विरार, कोल्हापूर, ठाणे, डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, लातूर, परभणी, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर, नांदेड, वाघाळा, सांगली-मिरज, कुपवाड, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, इचलकरंजी आणि जालना महानगर पालिकेच्या निवडणुका पार पडणार आहे. 



      १ कोटी ८१ लाख ९४ हजार २९२ पुरुष या निवडणुकीत मतदान करणार असून, १ कोटी ६६ लाख ८० हजार ४४९ महिला व ४,५९६ इतर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 


केवळ बृहन्मुंबई महानगर पालिका वगळता इतर २८ महानगरपालिकेच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने पार पडणार असून, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मतदारांना एका प्रभागातून एकाच सदस्याची निवड करावी लागणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता सर्व महानगरपालिकेच्या निवडणुकीत चार उमेदवारांना मतदान करायचं आहे.  


महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पुरेश्या पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात येणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या