सुनेत्रा पवार यांची बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड करण्यात आली आहे. शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे.
First Woman Deputy CM of Maharashtra :-
माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असणार याची चर्चा रंगली. आता त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. त्याविषयी आता महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी दिवं. अजित पवारांची पत्नी सुनेत्रा अजित पवार यांची निवड केली आहे. तसा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे.
![]() |
| Photo Source NDTV India |
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची कालच शपथ घेतली. राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी निवड झालेल्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद रिक्त झाले होते. त्यामुळे बीड आणि पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होईल याची चर्चा सुरू झाली होती. अखेर सुनेत्रा पवार यांनी पालकमंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर त्यांची वर्णी पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी लागली आहे.
नवनियुक्त महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ या विभागाच्या मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु, अजित पवार हयातीत असताना त्यांच्याकडे असलेलं अर्थखातं त्यांना मिळालेलं नाही.


0 टिप्पण्या