बिहार राज्याच्या वैशाली येथे भव्य "सम्यक दर्शन संग्रहालय सह स्मृती स्तूप" पूर्णपणे बनून तयार असून, स्तुपचे उद्घाटन मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते 29 जुलै ला होणार आहे. जवळपास 15 देशातील बौद्ध चीन, जपान, थायलंड, श्रीलंका, म्यानमार, भूतान, वियतनाम, कंबोडिया, मंगोलिया, लाओस, बांग्लादेश आणि इंडोनेशिया यांच्यासह अनेक देशातील बौद्ध भिक्षू भिक्षुणी या ऐतिहासिक उद्घाटना प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
72 एकर भूमि वर बनलाय स्तूप
550.48 च्या खर्चाने बनलेला 72 एकर भूमीवर स्तूप बनवण्यात आलेला आहे. स्तूप पवित्र पुष्करणी तळ्या जवळ विकसित केलेला आहे. 1958 62 च्या कालावधीत केलेल्या खुदाई मध्ये सापडलेल्या भगवान बुद्धांच्या अस्थि कलश या स्तूपाच आकर्षण ठरणार आहे. स्मृती स्तूप पूर्णपणे दगडांनी बनवलेला आहे. राजस्थान मधील वंशी पहाडपूर येथून बलुआ नावाचे दगड 42,373 मागवले असून, ग्रुव टेक्निकने जोडले गेलेले असून, आधुनिक भूकंप विरोधी टेकनिक वापरून हा स्तूप बनवल्या गेलेला आहे.
बिहार येथे होणार रोजगार निर्मिती
परिसरात ध्यान केंद्र, वाचनालय, संग्रहालय ब्लॉक, एम्फीथियेटर, कैफेटेरिया, सौर ऊर्जा यंत्र (500 किलोवाट), पार्किंग आणि इतर सोयी सुविधा होणार असून, उडीसा राज्यातील कलाकारांद्वारे बनवलेल्या भगवान बुद्धांची मूर्ती विशेष आकर्षण ठरेल. बिहार राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे.

0 टिप्पण्या