Hot Posts

6/recent/ticker-posts

"जगात भारताचा पहिला क्रमांक पटकावत सुहानी शाह ने रचला इतिहास", "पोस्ट शेअर करत म्हणाल्या हम जित गये"




जादूच्या क्षेत्रात भारताने मानाचा तुरा रोवला आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिक (FISM2025 ITALY) मध्ये सोशल मीडिया स्टार, महिला जादुगर आणि मेंटलिस्ट सुहानी शहा यांना "बेस्ट मॅजिक क्रियेटर" हा पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कार जिंकून सुहानी शहा यांनी देशाची नवी ओळख जगाच्या पटलावर निर्माण केली. FISM जादूशी संबंधित पेशा असलेल्या लोकांसाठी सर्वात प्रतिष्ठित जागतिक मंच आहे. ज्याला दुसरा जादूगारांचा ओलंपिक असे सुद्धा म्हणतात.


     पुरस्कार घेणारी पहिली भारतीय

एफआयएसएम संस्थेने २०२५च्या धोरणात बदल करून ऑनलाइन क्रियेटर्स यांना संधी दिली. ज्या नवीन जादू कलाकारांनी डिजिटल माध्यम वापरून जादू या कलेचा विस्तार केला. त्यांच्यासाठी त्यांनी ऑनलाइन व्यवस्था सुरू केली. सुहानी शहा यांनी प्रथम क्रमांक पटकावत  जादूच्या कलेमध्ये जगात मानाचा तुरा रोवला. सुहानी शहा यांच्या समवेत जैक रोड्स, जेसन लाडान्ये और मोहम्मद इमानी कलाकारांनी नाव नोंदवलं होतं. सुहानी शाही नाव नोंदवणारी फक्त एकमेव महिला असून, त्यामध्ये बाकी सगळे पुरुष होते. त्यांची ही कामगिरी सांगते की, जादू या क्षेत्रामध्ये पुरुषच प्रगती करत नसून, स्त्री सुद्धा मेहनतीच्या आणि कष्टाच्या बळावर प्रगती करत आहेत. 

                    

                     कोण आहेत सुहानी शाह?

सुहानी शहा एक जगप्रसिद्ध महिला जादूगर तसेच मेंटॅलिस्ट आहे. वयाच्या सातव्या वर्षीपासून तिने जादूचे शो करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत पाच हजार पेक्षा जास्त जादूचे शो त्यांनी केलेले आहेत. देश विदेशात त्यांचे चाहते आहेत. सुहानी शहा हे फक्त महिला जादूगर नसून कॉर्पोरेट ट्रेनर, लाइफ कोच आहेत.


         समाज माध्यमांवर पोस्ट शेअर करत म्हणाल्या 

मला जादू करणे खूप आवडतं आणि मी तुम्हाला जादू दाखवून,  तुमचं मनोरंजन करत राहणार आहे. जादू ही या देशाची प्राचीन कला असून, पूर्ण जगाने बघण्याची गरज आहे. आपण जिंकलो, आपण केलं आणि आपण मिळून केलं असे त्या म्हणाल्या. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या