Hot Posts

6/recent/ticker-posts

"रतन थियाम यांनी घेतला जगाचा निरोप" , "मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी वाहिली श्रद्धांजली"

 





आधुनिक भारतीय रंगभूमी चे महान कलाकार मणिपूरचे लेखक, कवी, नाटककार आणि नाटक दिग्दर्शक रतन थियाम यांनी 77 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. इंफाळच्या रीम्स दवाखान्यात त्यांनी शेवटचा जगाला निरोप बुधवारला दिला. लोकसभा खासदार गौरव गोगोई यांनी पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.

    

    गौरव गोगोई यांनी एक्स वर पोस्ट करत दिली माहिती

  रतन थियाम यांच्या निधनाने खूप दुःख झाले - महान रंगभूमीचे उस्ताद, दूरदर्शी कलाकार आणि भारतातील "थिएटर ऑफ रूट्स" चळवळीचे प्रणेते. त्यांचा वारसा पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांच्या कुटुंबियांना आणि रंगभूमीला मी मनापासून संवेदना देतो. असं म्हणत लोकसभा खासदार गौरव गोगोई यांनी दुःख व्यक्त केला.

                         

                    कोण होते रतन थियाम?

    "थेटर ऑफ रुटस" चे प्रमुख स्तंभ म्हणून त्यांची ख्याती होती. नाट्यकला मधील योगदान जवळपास पाच दशकांपासून राहिला. प्राचीन थिएटरचा त्यांनी विस्तार करत, नाटक लिहिण्याच काम केलं. प्राचीन भारतीय रुढींना ते आधुनिक प्रकारे मांडण्याचे प्रयत्न करत होते. त्यांची मांडणी आणि दिग्दर्शन हे मणिपुरी संस्कृति आणि सामाजिक मुद्द्यांवर आधारित होते. त्यांनी पेंटिंग लघुकथा आणि कविता लिहित करियर ची सुरुवात केली. यानंतर त्यांनी नाट्य समीक्षक म्हणूनही काम केले आणि रंगभूमीवरील संबंध वाढवत नेलं. 2013 ते 2017 या कालावधीत त्यांनी प्रतिष्ठित "नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा" चे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.



मणिपूर चे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी वाहिली श्रद्धांजली


"जड अंतःकरणाने मी श्री रतन थियाम यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबियांना मनापासून संवेदना व्यक्त केल्या. श्री रतन थियाम हे केवळ भारतीय रंगभूमी आणि संस्कृतीचे एक उत्तुंग प्रतीक नव्हते तर दुर्मिळ खोली, नम्रता आणि ज्ञानाचे आत्मा होते. त्यांच्या योगदानाने मणिपूर आणि संपूर्ण देशाच्या सांस्कृतिक परिदृश्यावर खोलवर छाप सोडली आहे. या गंभीर नुकसानाच्या क्षणी, मी त्यांच्या कुटुंब आणि प्रियजनां सोबत आहे, त्यांना या कठीण काळात सहन करण्याची शक्ती आणि सांत्वन मिळावे अशी प्रार्थना करतो. त्यांच्या आत्म्याला चिरंतन शांती लाभो" या आशयाचे एक्स वर पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली.


     रतन थियम यांना मिळालेले पुरस्कार


1987 ला त्यांना "संगीत नाटक पुरस्कार" संगीत नाटक अकॅडमी तर्फे देण्यात आला. नाटक या क्षेत्रात आपला अनमोल ठसा उमटवल्या मुळे त्यांना भारत सरकार तर्फे 1989 ला "पद्मश्री" पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या