लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) च्या वतीने देण्यात येणारा "लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025" केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. ०१ ऑगस्टला लोकमान्य टिळक यांचे 105 वी पुण्यतिथी निमित्त पहाटे १०.३० वाजता टिळक स्मारक मंदिर येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार सह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. डॉ. रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत अशी माहिती दिली.
नितीन गडकरी यांचीच निवड का?
नितीन गडकरी यांचा संकल्प पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या भागांना जोडण्याचा असून, प्रगतीशील देशांनी पायाभूत सुविधा, ट्रान्सपोर्ट आणि संवाद उत्तम राखला. नितिन गडकरी यांनी देशाच्या पायाभूत सुविधा, वाहतूक रचनेत बदल केला. यामुळे देशाची पायाभरणी होत आहे. देशात पायाभूत सुविधा आणि वाहतूक याचा विस्तार करण्याचा ध्यास केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचा हाच विचार, लोकमान्य टिळक यांचा असून, या विचारा सोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा विचार जुळत आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांचे म्हणणे आहे.
आजवर पुरस्काराचे वितरण कुणाला झाले?
1983 पासून हा पुरस्कार प्रदान करण्याला सुरुवात झाली. प्रथम पुरस्कार एस.एम. जोशी यांना जाहीर, कॉम्रेड डांगे, दिवंगत इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ नेते शरद पवार, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, मॉटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. के. सिवन, बाबा कल्याणी, डॉ. सायरस पुनावाला यांना पुरस्कार देण्यात आला. तर, 2024 चा पुरस्कार डॉक्टर सुधा मूर्ती यांना प्रदान करण्यात आला. दोन वर्षा पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

0 टिप्पण्या