"पी एम किसान सन्मान निधी" योजनेच्या अंतर्गत सरकार तर्फे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे टाकले जातात. परंतु, जून महिन्याचचा कालावधी उलटला तरीही शेतकरी शेतकरी 20 व्या हप्त्यापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. नियमानुसार जून मध्ये २०वा हप्ता सरकारने टाकला पाहिजे. देशभरातील शेतकरी 20 व्या हप्त्याची वाट बघत आहेत. परंतु, केंद्र सरकारकडून अद्यापही तारखेची घोषणा झालेली नसून, देशभरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरत आहे. केंद्र सरकार देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये योजनेचे आर्थिक मदत करेल अशी अपेक्षा आहे. अधिकृत घोषणेच्या पहिले केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने एक्स वर पोस्ट शेअर करत, गंभीर इशारा दिला.
काय आहे ही योजना
पी एम किसान सन्मान निधी या योजनेचे अंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जाते. वर्षातून तीन वेळा ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाते. चार महिन्यातून एकदा ही रक्कम शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खात्यामध्ये सरकार तर्फे दिले जाते. देशातील शेतकरी हा आर्थिक दृष्टीने मजबूत आणि सक्षम व्हावा ही यामागील केंद्र सरकारची भूमिका आहे.
अशातच केंद्र सरकारच्या "कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय" विभागाच्या "पीएम किसान सन्मान निधी" नावाच्या अधिकृत एक्स हॅण्डल वरून हा इशारा देण्यात आला.
पी एम किसान सन्मान निधी संबंधीत कुठल्याही पोस्टवर विश्वास ठेवू नका, अधिकृत पोस्ट येतील त्यावरच विश्वास ठेवा. अश्या आशयाचे पोस्ट कृषी मंत्रालयाच्या विभागाद्वारे लिहिण्यात आले.
कसा घ्यायचा योजने चा लाभ
सर्व प्रथम PMkisan.gov.in संकेतस्थळाला भेट द्या.
नंतर New Farmer Registration वर क्लिक करा.
संपूर्ण माहिती भरा
बैठक अकाऊंट डिटेल्स भरा
नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका त्यावरील येणारा ओटिपी वेरिफाय करा.


0 टिप्पण्या