Hot Posts

6/recent/ticker-posts

पूजा खेडकर यांच नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र अखेर रद्द", "नाशिक विभागीय आयुक्त यांचा निर्णय"

 




गेल्या काही दिवसां पासून चर्चेत असलेल्या प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांची नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र नाशिक विभागीय आयुक्त दिलीप गेडाम यांनी अवैध ठरवले आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी क्रिमेलेयर प्रमाणपत्राची आवश्यकता असते. प्रमाणपत्रच रद्द झाल्याने त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे. यानंतर तत्काळ खेडकर यांनी मंत्रालयात  महसूल सचिव आबासाहेब धुळे यांच्याकडे धाव घेतली असल्याचे बोलले जात आहे. 


                              प्रकरण काय?

पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. कार्यालयात जात असताना महागड्या गाड्या सोबत घेऊन जात आणि तेथील कर्मचाऱ्यांना वागणूक बरोबर देत नसल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याला आधार घेऊन सरकार तर्फे चौकशीचे आदेश देण्यात आले. पूजा खेडकर ने क्रिमिलेयर प्रमाणपत्र यूपीएससी ला सादर केले होते. मात्र वाद निर्माण झाल्यानंतर, केंद्र सरकारने त्या प्रमाणपत्राची चौकशी करण्याचे आदेश विभागीय नाशिक आयुक्त यांना दिले. चौकशी अंती नाशिक विभाग आयुक्त यांनी प्रथम क्रीमेलेयर प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश पारित केले.

                    कुटुंबाची पार्श्वभूमी काय?

पूजा खेडकर यांचे वडील महाराष्ट्र पोलुशन कंट्रोल बोर्ड चे रिटायर्ड अधिकारी आहेत. त्यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. निवडणूक आयोगाला उत्तर देत असताना त्यांच्या वडिलांनी 40 कोटी रुपये असल्याची माहिती दिली होती. त्यांच्या वडिलांचं उत्पन्न हे उत्पन्न मर्यादेशी जुळत नसून, अनेक प्रश्न निर्माण करतात.

                    कोण आहेत पूजा खेडकर?

पूजा खेडकर यांनी श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज येथून एमबीबीएस ची डिग्री मिळवली. नंतर यूपीएससी परीक्षा 841 रँक मिळवत २०२१ साली पूर्ण केली. मात्र गेल्या वर्षी 2024 ला पुणे जिल्हाधिकारी येथे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून निवड झाली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या