WWE चे नावाजलेले सर्वांचे लहानपणीचे हिरो wwe सुपरस्टार आणि कुस्तीपटू हल्क होगन यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले. 80 च्या दशकातील WWE त्यांनी गाजवली. आंतरराष्ट्रीय वृत्त संस्थेच्या रिपोर्ट नुसार, त्यांनी 24 तारखेलाच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चाहत्यां मध्ये शोककळा पसरली असून, त्यांना आदरांजली वाहत आहे. हृदय विकाराने त्यांचे निधन झाले. TMZ Sports च्या रिपोर्ट्स नुसार, " गुरुवारी सकाळी WWE आयकॉनच्या क्लियरवॉटर, फ्लोरिडा येथील घरी डॉक्टर पाठवण्यात आले. त्यांनी स्त्रेचर च्या मदतीने अँब्युलन्स मध्ये ठेवले आणि दवाखान्यात पोहचवलं. परंतु, त्यांचे तेव्हा निधन झाले."
कोण आहेत हल्क होगण?
हल्क होगन यांचं खरं नाव टेरी जीन बोलिया होतं. 1980 ते 90 च्या दशकातील WWE चे सर्वात मोठे सुपरस्टार होते. त्यांनी WWE ला लोकप्रिय बनवण्यात सर्वात मोठी भूमिका बजावली. WWE ची चॅम्पियनशिप सहा वेळा जिंकले. 2005 मध्ये WWE फेम मध्ये सहभागी झाले. त्यांच्या "हल्क-मैनिया", "एटॉमिक लेग ड्रॉप", "सिग्नेचर मूव्स", आणि "डायलॉग्स" मुळे त्यांनी ख्याती प्राप्त केली होती. त्यांची हाइट 6 फूट 7 इंच इतकी होती. त्यांच वजन 140 किलो ग्रॅम होतं. रिंग में उनके दाखिल होते ही फैंस का उत्साह दोगुना हो जाता था. रिंग मध्ये त्यांच आगमन होताच चाहत्यांच आनंद गगनात मावत नव्हते.
त्यांच्या जाण्याने चाहते फार व्यथित झाले. त्यांची हल्क मशीन, सुपर डिस्ट्रॉयर आणि मिस्टर अमेरिका अशी ओळख चाहत्यांमध्ये झाली.
WWE, अंडरटेकर आणि ट्रिपल एच ने वाहिली आदरांजली
WWE हॉल ऑफ फेमर हल्क होगन यांचे निधन झाल्याचे ऐकून, WWE ला खूप दुःख झाले आहे. पॉप संस्कृतीतील सर्वात ओळखण्या योग्य व्यक्तिमत्त्वां पैकी एक. होगन यांनी १९८० च्या दशकात WWE ला जागतिक मान्यता मिळवून देण्यास मदत केली. WWE होगनच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि चाहत्यांना शोक व्यक्त करते, असं WWE ने एक्स वर लिहिलं.
"कुस्ती जगताने एक खरा दिग्गज गमावला आहे. आमच्या व्यवसायात त्यांचे योगदान अतुलनीय आहे आणि त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो.धन्यवाद, हल्क होगन". अश्या आशयाचे WWE चे सुपरस्टार अंडरटेकर यांनी एक्स वर पोस्ट लिहित, श्रद्धांजली वाहिली.
रिंगमध्ये स्पर्धा करणाऱ्या मोठ्या पात्रांशिवाय WWE आज जिथे आहे, तिथे पोहोचले नसते. आणि टेरी "हल्क होगन" बोलेयापेक्षा फार कमी, जर असतील तर, मोठे दिसले असते. तो "सुपरस्टार" असण्याचा अर्थ काय आहे याचे आदर्श उदाहरण होता - एक जागतिक खळबळ ज्याने लाखो लोकांना जे काही साध्य करायचे होते त्यासाठी कठोर परिश्रम करण्यास प्रेरित केले आणि असा लूक ज्यामुळे तो जगभरातील चाहत्यांना ओळखता आला. लाल आणि पिवळा किंवा काळा आणि पांढरा रंगाचा पोशाख घातलेला हल्क होगन, सोप्या भाषेत, प्रतिष्ठित होता. एक खरा अमेरिकन किंवा उद्योगातील सर्वात मोठ्या गटांपैकी एकाचा नेता म्हणून, त्याने संपूर्ण व्यवसायाला अशा उंचीवर नेले आणि वाढवले जे यापूर्वी कधीही पाहिले नव्हते - प्रत्येक देशात आणि प्रत्येक खंडात. द हल्कस्टरसारखा कोणीही नव्हता आणि कदाचित दुसरा कोणीही नसेल. माझे कुटुंब त्याच्या कुटुंबाला, मित्रांना आणि चाहत्यांना त्यांच्या संवेदना पाठवतो." अशी पोस्ट लिहित, "ट्रिपल एच" यांनी कुटुंबा प्रति संवेदना व्यक्त केल्या.

0 टिप्पण्या