Hot Posts

6/recent/ticker-posts

"आपटून आपटून कुणाला आणि कसे मारणार? खासदार वर्षा गायकवाड सह दोन महिला खासदार कडाडल्या", "महाराष्ट्रा विरोधात खासदार निशिकांत दुबे यांनी केलं होतं बेताल वक्तव्य"




नवी दिल्ली:- 

संसद भवन च्या लॉबी मध्ये तीन लोकसभा महिला खासदार यांनी निशीकांत दुबे यांना घेरून जाब विचारला. खासदार वर्षा गायकवाड, खासदार प्रतिभा धानोरकर आणि शोभा बच्छाव यांनी जाब विचारताच दुबे यांना सुचेनासे झाले. त्यामुळे त्यांनी तिथून जाण्यातच भले आहे असे ठरवले. त्याचवेळी "जय महाराष्ट्र" घोषणा देत संसद हादरवले. हा आवाज संसदेमध्ये घुमताच इतर महाराष्ट्रातले खासदार यांनी लॉबी मध्ये धाव घेतली आणि त्यांनी सुद्धा जाब विचारण्यास सुरुवात केली. बुधवारला ही घटना घडली.
   

संसदेत विरोधकांनी मॉन्सून सत्रात गदारोळ माजवल्या नंतर, संसद काही वेळा साठी तहकूब करण्यात आली होती. नेमका याच संधीचा फायदा घेत, निशीकांत दुबे यांचा शोध घेतला. त्यावेळी त्यांना निशिकांत दुबे लॉबी मध्ये सापडले. तिथेच दुबे यांना तिघींनी जाब विचारला. "तुमची लोकांना मारण्याची भाषा योग्य नाही. आपटून आपटून कुणाला मारणार आहात? याबद्दल सांगा? तुमची अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही. आणि महाराष्ट्र बद्दल बेताल वक्तव्य करणे बंद करा आणि महाराष्ट्राची जाहीर माफी मागा. असे म्हणत त्यांना धारेवर धरले. असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाले. प्रश्नाला उत्तर देताना, निशिकांत दुबे "यांनी आप तो मेरी बहन है" म्हणत तिथून पळ काढला.


महाराष्ट्रात मराठी विरुद्ध अमराठी वाद सुरू असताना, निशीकांत दुबे राज ठाकरे यांना उद्देशून म्हणाले होते, "राज ठाकरे तुम्ही बिहार ला या, तुम्हाला आपटून आपटून मारू". यावर प्रतिक्रिया देत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले होते, "दुबे जर तुम्ही मुंबई ला आलात, तर तुम्हाला समुद्रात डुबवून डूबवून मारू". अनेकांना वाद इथेच थांबला असे वाटायला लागला असताना, हा वाद थेट संसदेच्या लॉबी मध्ये पोहचला.
महाराष्ट्रात भाषा वाद निर्माण होण्याच कारण म्हणजे राज्य सरकारने काढलेला पहिली पासून त्रिभाषा सूत्र म्हणून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा जीआर. त्याला विरोध करत राज आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने एकत्र मोर्चा काढत असल्याचे जाहीर करताच सरकारने जीआर मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर हिंदी सक्ती विरोधात दोघांनी एकत्र सभा घेतली.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या