"केंद्रीय कर्मचाऱ्यांची मज्जाच मज्जा" "आता घेऊ शकणार 30 दिवसांची सुट्टी" "केंद्र सरकारने दिलं राज्यसभेत स्पष्टीकरण"

 



नवी दिल्ली:-

 जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल, आणि तुम्हाला वृद्ध आई वडील यांची काळजी घायची इच्छा असेल आणि कामामुळे आई वडील यांची काळजी घेऊ शकत नसाल. तर, तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आता महिन्याभराची सुट्टी घेऊ शकणार आहे, असा खुलासा राज्यसभेत केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी केला. परंतु, यासाठी सरकारने वृद्ध आई-वडिलांचा योग्य काळजी घेणे किंवा वैयक्तिक कारणासाठी या सुट्टीचा वापर करता येईल अशी अट सरकारने घातली आहे. हा निर्णय गुरुवार ला घेण्यात आला आहे.
         वृद्ध आई-वडिलांची काळजी घेण्याकरिता किंवा वैयक्तीक कारणासाठी सुट्टी घेण्यासाठी विशेष तरतूद आहे का?असा प्रश्न राज्यसभेत विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना कामगार मंत्रालयाने राज्यसभेत लेखी माहिती दिली.

       केंद्रीय नागरी सेवा रजा कायदा 1972, मध्ये तीस दिवसांची पगारासह रजा, वीस दिवसांसाठी अर्ध पगारी रजा, आठ दिवसांची प्रासंगिक रजा, तर दोन दिवसांची प्रतिबंधित रजा देण्याची विशेष तरतूद आहे, राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना  जितेंद्र सिंह यांनी कायद्याचा उल्लेख करत माहिती दिली.

   सरकारने केंद्रीय कर्मचारी असलेल्यांसाठी निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांना फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. अपेक्षा आहे की या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी होईल आणि कर्मचारी त्यांचे कौटुंबिक जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडू शकतील.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या