Hot Posts

6/recent/ticker-posts

"लवकरच सर्पमित्र ठरणार फ्रंट लाईन वर्कर", "महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुख्यमत्र्यांकडे शिफारस"

  




सर्पमित्र यांच्यासाठी ही आनंदाची बाब ठरणार असून, राज्य शासन तर्फे सर्पमित्रांना फ्रंटलाईन वर्कर दर्जा प्राप्त होणार आहे. सर्पमित्र हे प्राणी आणि मनुष्य यांचा दोघांचाही जीव वाचवत असतात. त्यामध्ये कधीकधी विषारी साप हाताळत असताना चुकून साप चावल्याने अनेकांचे दुर्दैवी मृत्यू होत असतो आणि त्यामुळे अनेकांच्या कुटुंबांवर त्याचा परिणाम होत असतो. याच कारणामुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्पमित्रांना "फ्रंट लाईन वर्कर" चा दर्जा मिळावा अशी शिफारस त्यांनी केली आहे. यासह दहा लाखांचा विमाअधिकृत ओळखपत्र यांचाही समावेश आहे. 

          सर्पमित्र यांच काम हे फार जोखमेच असतं. त्यांना जसा एखाद्या खेड्यातून किंवा शहरातून फोन आला तर लगेच निघावं लागतं आणि त्यामुळे ते आपलं कर्तव्य समजून ते घरून निघत असतात आणि त्या साप आणि मनुष्य या दोघांचही रक्षण करत असतात. अनेकदा त्यांना वेळेवर निर्माण होणाऱ्या  परिस्थितीला तोंड द्यावे लागते. ज्या भागात साप आहे त्या भागात जाऊन सर्पमित्रांना सापाचा रेस्क्यू करावा लागतो. थोडीशी सुद्धा चुकी जीवावर बेतू शकते याचं भान ठेवून सर्पमित्र वागत असतात. अशातच शासनाने त्यांच्या  अधिकृत ओळखपत्र व दहा लाखांचा विमा, तसेच फ्रंट लाईन वर्करचा दर्जा मिळणे या मागणी साठी तत्काळ बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.  ही सर्पमित्रांसाठी आनंददायक बाब आहे. या निर्णयामुळे सर्पमित्र अजून जोमाने काम करतील अशी अपेक्षा आहे. 

            सर्पमित्र आणि प्राणी मित्र यांच्या प्रश्नासंबंधी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल एक बैठक बोलावली होती. त्यामध्ये सर्पमित्र आणि प्राणी मित्र यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. अशी माहिती स्वतः महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स वर पोस्ट करत लिहिली. 

       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या