Hot Posts

6/recent/ticker-posts

"महाराष्ट्रातील कोणीतरी पंतप्रधान व्हावं हीच इच्छा" :- प्रकाश आंबेडकर

 




पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या कार्यालय मध्ये नाही. परंतु, देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन आले असल्याची माहिती मला मिळाली.  या कार्यालयात  बसायचं आहे, असे मुख्यंत्र्यांचे आधीच ठरल्याचे दिसते. देवेंद्र फडणवीस यांची ही ईच्छा असून ती पूर्ण व्हावी आणि एकदाच कोणी तरी महाराष्ट्राचा पंतप्रधान व्हावा ही माझी ईच्छा आहे. असे मत वंचीत बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मांडले. 

           पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले, "शासनाने हिंदीची सक्ती होणार नाही असे जाहीर केले. त्यानंतर काहीही झालं तरी आम्ही राज्यात हिंदी भाषा सक्ती करू अशी भूमिका घेतली. मुख्यमंत्री स्वतःला पंतप्रधानांच्या शर्यतीत आणत आहेत. असे मी काही दिवसांपूर्वी बोललो होतो. 

     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयार केलेले नियम, नरेंद्र मोदी अनेकदा पाळत असतात. या कारणाने नियम ते स्वतःला ही लावतील. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना कणा असेल. तर, आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि सुब्रमण्यम स्वामी यांना जो नियम लावला तोच नियम मोहन भागवत नरेंद्र मोदी यांच्या वर लागू करतील. आमचा भाजप शी संबंध नाही असे बोलून त्यांनी पळवाट काढायला नको, असेही ते म्हणाले. 

    "कॅबिनेटचा राजीनामा घ्यायचा की नाही असा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असून, उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा नाही. आपल्या लेटर हेड वर उप मुख्यमंत्री पद लावणे संवैधानिक नसल्याने आणि उप-मुख्यमंत्री या पदा विरोधात हाई कोर्ट च्या निर्णयाचा अवमान झाला असं ग्राह्य धरून कोणी अर्ज केला तर त्यावर कोर्ट काय निर्णय देईल सांगता येणार नाही" असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या