संसदरत्न पुरस्काराचे मानकरी 17 खासदार", "महाराष्ट्रातून 7 खासदारांची वर्णी"

 




दरवर्षी प्रमाणे "प्राईम पॉइंट फाउंडेशन" संस्थेच्या वतीने देण्यात येणारा "संसद रत्न" पुरस्कार यंदा जाहीर झाला असून, या पुरस्काराचे 17 खासदार यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून 7 जणांची निवड करण्यात आली आहे. संसदेमध्ये त्यांच्या कार्यक्षमतेला नागरी समाजातून मिळणारा हा सन्मान राजकीय क्षेत्रात मोठा गौरव मानला जातो. दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग चे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या ज्युरी या समितीने उत्कृष्ट काम करणाऱ्या खासदारांच मूल्यांकन करून समितीने हा पुरस्कार जाहीर केला.
भर्तृहरी महताब (भाजप, ओडिशा), एन.के.प्रेमचंद्रन(आरएसपी, केरळ), सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी सपा, महाराष्ट्र), श्रीरंग आप्पा बारणे (शिवसेना, महाराष्ट्र) यांना पुरस्कार मिळणार असून, स्मिता उदय वाघ (भाजप), अरविंद गणपत सावंत (शिवसेना यूबीटी), नरेश गणपत म्हस्के (शिवसेना), प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी (भाजप) यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तर इतर राज्यातील खासदार प्रवीण पटेल, भाजप खासदार रवी किशन, भाजप खासदार डॉ. निशिकांत दुबे, खासदार बिद्युत बरन महतो, खासदार पी.पी. चौधरी, खासदार मदन राठोड, डीएमके खासदार सी.एन. अण्णादुराई आणि खासदार दिलीप सैकिया यांना जाहीर झाला आहे. प्रदेश, झारखंड आणि राजस्थानला प्रत्येकी २ खासदारांना संसदरत्न पुरस्कार मिळाले आहेत. ओडिशा, तामिळनाडू, केरळ आणि आसाम राज्यातील प्रत्येकी एका खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. 14 सन्मान समारंभांमध्ये एकूण 125 पुरस्कार 2024 पर्यंत प्रदान करण्यात आले आहेत. हा पुरस्कार सरकार कडून प्रदान करण्यात येत नाही. परंतु, या पुरस्कारार्थी निवड समितीत संसदीय कामकाज मंत्री अध्यक्ष असतात तर सदस्यपदी इतर सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश असतो.

           

         संसद रत्न पुरस्काराची सुरुवात कशी झाली?

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सल्ल्यानुसार 2010 ला प्राइम पॉइंट फाउंडेशन आणि ई-मॅगझिन प्रेसेन्स यांनी संसद रत्न पुरस्काराची स्थापना केली. पुरस्काराचे उद्घाटन माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते या पुरस्काराचे चेन्नई येथे करण्यात आले होते. त्यावेळी प्रथम पुरस्कार चंद्रपूर मतदारसंघाचे माजी खासदार हंसराज अहिर यांना प्राप्त झाला होता.

              पुरस्कार कुणाला दिला जातो?

सभागृहात जास्तीत उपस्थित असणे, जास्तीत जास्त प्रश्न विचारणे, चर्चा सुरू असताना जास्तीत जास्त सहभाग घेणे, स्वतःहून लोकोपयोगी बिल सादर करणे या निकषांवर हा पुरस्कार दिला जातो. तिन्ही अधिवेशनात खासदार किती सक्रिय आहे या निकषावर पुरस्कार प्रदान केल्या जातो.

राज्यातील सात खासदारांना संसद्रारत्न पुरस्कार मिळणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यावरून असे निदर्शनास येते की जनतेने निवडून दिलेले जनप्रतिनिधी सक्रियतेने प्रश्न मांडत असतात.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या