Hot Posts

6/recent/ticker-posts

"सैय्यारा"चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ", "9 व्या दिवशी कमवले तब्बल 200 कोटी रुपये"

 


          सैय्यारा चित्रपटाचा चा बॉक्स ऑफिस वर जादू कायम असून, चित्रपटाने 9 व्या दिवशी 200 कोटी च्या वर कमाई केली आहे अशी माहिती ट्रेड वेबसाईट सैकनील्क च्या रिपोर्ट्स कडून मिळाली. चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित सुरी आहेत. तर, यश राज फिल्म्स चे अक्षय विधानी निर्माते आहेत. चित्रपटात मुख्य कलाकार अहान पांडे आणि अनित पड्डा आहेत. आदित्य चोपडा यांनी चित्रपटाला प्रेसेंट आहे. चित्रपट 18 जुलै ला सिनेमागृह मध्ये प्रदर्शित झाला. तेव्हा पासून चित्रपट अनेक वर्षापासून इंडस्ट्री मध्ये कार्यरत असणाऱ्या मोठमोठ्या कलाकारांना मागे सोडत आहे. युवकांना प्रचंड वेड लावत आहे. अहान आणि अनिता यांची रोमँटिक जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. अहान पांडे आणि अनित पड्डा दोघेही चित्रपट सृष्टी साठी नवागत (New Comers) आहेत हे या चित्रपटाचे विशेष आहे. सैयारा ने फकत चार दिवसात 100 कोटी कमावले आणि बॉक्स ऑफिसवर आपला धाक कायम ठेवला.

                 

              2025 ची दुसरी सर्वात हिट चित्रपट 

     या वर्षीची दुसरी सर्वात हिट चित्रपट म्हणून ओळखल्या जातेय. पहिला सर्वात हिट चित्रपट म्हणून छावा चित्रपटाची ओळख आहे. 9 व्या दिवशी सैयारा चित्रपटाने 26.5 कोटी रुपये कमावले असून, चित्रपटाने एकूण 217.5 कोटी रुपये कमावले असून, सलमान खान ची सिकंदर, आमिर खान ची सितारे जमीन पर, अजय देवगन ची रेड 2 आणि अक्षय कुमार ची हासउफुल-5 चित्रपट बहुमान मिळवू शकला नाही. सैयारा ने हाउसफुल-5 ला मागे सोडत बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घातला, ज्या चित्रपटाचं लाइफटाइम कलेक्शन 198.41कोटी रुपये इतके होते.

         चित्रपटाचे फोटोग्राफी दिग्दर्शक विकास सिवरमान आहेत. डायलॉग्ज रोशन शंकर यांनी लिहिले. तर सहाय्यक निर्माते ऋषभ चोपडा हे असून, कोरिओग्राफी दिग्दर्शक विजय गांगुली आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित सुरी यांनी नवागत लोकांना संधी दिली त्यामुळे चित्रपट उत्कृष्ट कमवत असल्याची चर्चा आहे.

                 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या