Hot Posts

6/recent/ticker-posts

"काँग्रेसने ओबीसींचे हित बघितले नाही :- राहुल गांधी", "मायावती आणि प्रकाश आंबेडकर यांचे खडेबोल"




ओबीसींचे प्रश्न मला त्यावेळेस सखोलतेने समजलेले नव्हते. दलितांना येत असणाऱ्या समस्या मला उत्तम प्रकारे कळले. अस्पृश्यता हा त्यांचा इतिहास आहे हे तत्काळ माहिती होत असून, अनुसूचित जमाती चे प्रश्न त्यांच्या राहत असलेल्या ठिकाणी गेलं की, जल जंगल जमीन या प्रश्नाबद्दलची लगेच माहिती मिळते आणि आपण उत्तम रित्या समजू शकतो. परंतु, ओबीसी चे अडचणी शक्यतो दिसत नसून, लपून राहतात. जर मला ओबीसींच्या इतिहासा बद्दल किंवा त्यांना येत असलेल्या अडचणीं बाबत थोडं जरी माहिती मिळाली असती. तर, मी तेव्हाच जाती जनगणना करण्याचा निर्णय घेतला असता. आता मला त्या चुकीचा पश्र्चाताप होत असून, त्या चुकीला मी सुधारण्याचा निर्णय घेतला आहे. असे अखिल भारतीय काँग्रेस चे सर्वेसर्वा राहुल गांधी दिल्ली येथील भागीदारी न्याय्य महासंमेलन या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
पुढे राहुल गांधी म्हणाले की, ज्याप्रकारे आम्ही तेलंगणा राज्यात जातीगत जनगणना केली ते राजकीय भूकंप आहे. देशाच्या राजनैतिक जमिनीला या जनगणनेने हलवून सोडलं आहे. त्याचा निकाल (aftershock) तुम्हाला आताच लागणार नसून, तुम्हाला वेळ येईल तेव्हा लागेल.
21 व दशक डाटा च असून, जो डाटा आज तेलंगणा सरकार च्या हातात आलेलं आहे. त्याच्याशी देशात कुठेच स्पर्धा नाही. तेलंगणा राज्यातील कॉर्पोरेट आणि व्यवस्थापन क्षेत्रात किती दलित, आदिवासी आणि ओबीसी मालिक आहेत हे आम्ही काही क्षणात सांगू शकतो. या देशात मजदूरी दलित ओबीसी आदिवासी करतात. कुठल्याही देशाला त्याची उत्पादक शक्ती चालवत असते. उत्पादक शक्ती जर देशाला अन्न, इमारत आणि औजार देत असतील तर घामाच्या मोबदल्यात त्या शक्तीला देश काय देतो? हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

                     मायावती यांनी दिले प्रत्युत्तर

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते कडून मोठी लोकसंख्या असलेल्या इतर मागास वर्ग (ओबीसी) समाजच्या लोकांची सामाजिक राजनैतिक व आर्थिक महत्त्वाकांक्षा व आरक्षण सोबत त्यांच संवैधानिक हक्क देण्यात कांग्रेस पार्टी खरी व विश्वासपात्र नाही राहिली आहे. त्यांच्या ओठात काही आणि पोटात काही असे स्वार्थी राजकारण आहे असं दिसतंय. असे बहुजन समाज पक्षाचे सर्वेसर्वा बहन मायावती यांनी एक्स वर पोस्ट करत राहुल गांधी यांनी ओबीसीं वर केलेल्या वक्तव्य विरोधात शाब्दिक हल्ला चढवला.


     प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना सुनावले

तुम्ही म्हणालात की, जातीनिहाय जनगणना झाली नाही आणि ओबीसींना त्यांचे हक्क मिळाले नाहीत ही तुमची चूक असून, सर्वप्रथम, तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की ही चूक नाही. तर, बहुजनांविरुद्ध केलेला गुन्हा आहे आणि बहुजनांविरुद्धचा हा गुन्हा तुमच्या आजी इंदिरा गांधी, तुमचे वडील राजीव गांधी, तुमची आई सोनिया गांधी, तुम्ही आणि तुमचा काँग्रेस पक्ष यांनी अनेक दशकांपासून एकत्र येऊन केला आहे. असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी  राहुल गांधी यांना खडेबोल सुनावले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या