Hot Posts

6/recent/ticker-posts

"वाढदिवसानिमित्त स्पेशल", "पक्षप्रमुख ते मुख्यमंत्री कसा होता उद्धव ठाकरे यांचा प्रवास?", नैसर्गिक आपत्तींना दिले होते तोंड"

 


 

"आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस"




उद्धव ठाकरे यांचा जन्म 27 जुलै 1960 ला मुंबई येथे बाळ ठाकरे आणि मीना ठाकरे यांच्या घरी झाला. त्यांच शिक्षण बालमोहन विद्यामंदिर या शाळेत झालं असून, त्यांनी जमशेटजी जेजे भाई स्कूल ऑफ आर्ट पदव्यूत्तर "फोटोग्राफी" या विषयात शिक्षण पूर्ण केलं. प्रबोधनकार ठाकरे त्यांचे आजोबा लागतात. बाळासाहेब ठाकरे यांचे 2012 ला दुःखद निधन झाल्या, नंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. 

                      फोटोग्राफर ते राजकारणी

राजकारणात येण्या अगोदर फोटोग्राफी मध्ये त्यांनी करिअर करण्याचं ठरवलं होतं. जहांगीर आर्ट गॅलरी येथे त्यांनी महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांचे आकाशातून टिपलेले फोटो चे संग्रह त्यांनी 2004 ला प्रदर्शित केलं. कान्हा , गिर , रणथंभौर , भरतपुर येथील राष्ट्रीय उद्यानों सहित वन्य प्राण्यांचे फोटोग्राफ त्यांनी काढलेले आहेत. सर्वात पहिले भरवलेल्या फोटोग्राफी प्रदर्शनीचे नाव त्यांनी "लिव आणि लेट लिव" हे नाव देण्याचं ठरवलं.

फोटोग्राफी करत असताना कुटुंबातील सदस्यांच्या सांगण्यानुसार, राजकारणात पहीलं पाऊल टाकलं. आणि इथूनच त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या दरम्यान अभियान प्रभारी पद 2002 साली देण्यात आलं. त्यानंतर शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवला. 2003 साली त्यांची नियुक्ती शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून करण्यात आली. मुखपत्र सामना मध्ये त्यांची मुख्य संपादक या पदावर 2006 साली वर्णी लागली. मुख्यमंत्री होण्या अगोदर त्यांनी सामना च्या मुख्य संपादक या पदावरून 2019 लाच राजीनामा दिला. त्यांचे लहान भाऊ राज ठाकरे (काकांचे मुल) यांनी शिवसेनेची साथ 2006 साली सोडली. वेगळी वाट धरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष त्यांनी उभारला.

                       राजकारणी ते मुख्यमंत्री

2006 ते 2012 या काळात शिवसेना पक्षाच काम त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे पाहत होते. 2012 साली बाळासाहेब ठाकरे यांच दुःखद निधन झालं. त्यानंतर पक्षाची धुरा उद्धव ठाकरे यांनी सांभाळली. तर, 2013 साली पक्षाचे अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली.
2019 ची लोकसभा निवडणूक, 2019 विधानसभा निवडणूक त्यांनी भाजप सह लढवली. परंतु, 2019ची विधानसभा निवडणूक जिंकल्या नंतर भाजप सोबत त्यांचे अनेकदा खटके उडत. 2019 ला राज्यपाल कोश्यारी यांच्या निमंत्रणावरून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी उप मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार शरद पवार यांनी बहुमत साठी आकडेवारी जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या तिन्ही पक्षांची एक आघाडी म्हणून महविकास आघाडी ची नावाची आघाडी स्थापन केली आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. १७२ च्या बहुमत आधारावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.
                

                          शिवसेनेत पडली फूट
     

 शिवसेना पक्षात 2022 मध्ये फूट पडली आणि शिवसेना चे 2 गट तयार झाले. पहिला उद्धव ठाकरे यांचा आणि दुसरा एकनाथ शिंदे चा. एकनाथ शिंदे यांच्या सोबत अनेक जन उद्धव ठाकरे यांच्या गटातील येऊ लागले. त्यामुळे त्यांना असं वाटू लागले की आपलं आता मुख्यमंत्री पदावर राहणे योग्य नसून त्यांना विधान भवनात बहुमत चाचणीला सामोरे जावे लागले असते त्यामध्ये त्यांच्या कडे पुरेसे संख्याबळ नसल्या कारणाने त्यांनी 2022 ला राजीनामा दिला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षा वर दावा केला. तेव्हापासून सुप्रीम कोर्टात शिंदे विरुद्ध उद्धव गट यांचा सुप्रीम कोर्ट मध्ये वाद सुरू आहे.
यंदा उद्धव ठाकरे यांच्या गटाने लोकसभा आणि विधान सभा निवडणूक महाविकास आघाडी च्याच नावाखाली लढवल्या. लोकसभेत फार चांगली कामगिरी बजावली. परंतू , विधानसभा निवडणुकी मध्ये पराभव मिळाला.

                     राज उध्दव भेट मातोश्री

मनसे प्रमुख राज ठाकरे  20 वर्षानंतर मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या घरी वाढदिवसानिमित्त भेट दिली. काही दिवसा आधी हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात अनेक वर्षानंतर दोघांनी एकत्र येत विरोध दर्शवला होता. 

                 नैसर्गिक आपत्तींना दिले तोंड

   मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच काही दिवसांनी कोकण सह किनारपट्टी भागात चक्रीवादळ ने थैमान घातले. त्यांनी प्रशासनाला आदेश देताच किनारपट्टी वरील भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात आले. त्यावेळेस कोविडने सुद्धा संपूर्ण जगात दहशत पसरवली होती. 2022 साली इंडिया समुहा तर्फे केलेल्या सर्वेक्षणात "सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्री" यादीत चौथा क्रमांक पटकावला. 



                       


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या