पुणे:-
कर्जत जामखेड मतदार सघांचे आमदार रोहित पवार यांची "महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे" च्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली असून, दुसऱ्यांदा राजकीय आखाडा गाजवल्या नंतर आता कुस्तीच्या आखाड्यात सुद्धा त्यांनी प्रवेश मिळवला. पुण्यातील वारजे येथे "महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद" संघटनेची निवडणूक रविवार ला पार पडली. त्यात त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री. अनंत बदर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ही अनेक वर्षापासून कार्यरत आहे. परंतु, दोन वर्षा आधी संघटनेची मान्यता आणि राजकारणाच्या फंद्यात अडकल्याने निवडणूक आणि वैधते विषयी संभ्रम निर्माण झाला होता. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ खरा की महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद खरा हा संभ्रम काही दिवसांनी कोर्टात पोहचला. वारजे येथे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद संघटनेची बैठक रविवार ला पार पडली.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदे चा इतिहास
दिवं. मामासाहेब मोहोळ यांनी "महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेची" स्थापना केली. संघटनेचे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी 40 वर्ष काम पाहिले. संघटनेच्या मदतीने अनेक कुस्तीपटू यांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती प्राप्त केली आहे. अनेक कुस्तीपटू ना ख्याती प्राप्त झाल्या नंतर त्यांना चांगल्या पदावर नौकऱ्या सुद्धा लागल्या आहेत. चाळीस वर्ष संघटनेचे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी काम पाहिल्या नंतर आता तीच जबाबदारी आमदार रोहित पवार यांच्या कडे आलीय.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन
आमदार रोहित पवार हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या अध्यक्ष पदी विराजमान आहेत. त्यांनी आयपीएलच्या माध्यमातून सलग तीन वेळा "एमपीएल" यशस्वीपणे आयोजन करून दाखवले. तसेच गेल्यावर्षी अहिल्यानगर येथे महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या माध्यमातून भरवण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेत वाद झाल्याने आणि या स्पर्धेच्या वैधतेबाबत संभ्रम निर्माण झाले. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेला विश्वासात घेत, "महाराष्ट्र केसरी कुस्ती " कर्जत येथे ६६ वी स्पर्धा आयोजित करून दाखवली.
रोहित पवार राजकारणा नंतर आता कुस्ती मध्ये कसा आणि काय प्रयोग करतात, याकडे सर्व राज्य आणि कुस्तीपटूचं आणि क्रिकेट प्रेमींच लक्ष असेल.


0 टिप्पण्या