Hot Posts

6/recent/ticker-posts

"महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप मध्ये रचला इतिहास" "नागपूरच्या दिव्या देशपांडे हिने 19 व्या वर्षी केली एतिहासिक कामगिरी"

 



जॉर्जिया देशातील बटुमी शहरात पार पडलेल्या महिला बुद्धिबळ वर्ल्ड कपच्या (फिडे) अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने इतिहास रचला असून, तिने अनुभवी आणि उच्च मानांकन असलेल्या कोनेरू हम्पीचा पराभव करत विजेतेपद आपल्या नावे केले. असे विजेतेपद पटकवणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. उपांत्य लढतीतल्या दुसऱ्या फेरीत दिव्यानं चीनची माजी वर्ल्ड चॅम्पियन झोंगयी टॅन हिला हरवत फायनलमध्ये प्रवेश केला होता. या विजयासह दिव्या ग्रँडमास्टरचा किताब मिळवणारी चौथी भारतीय महिला ठरली आहे. याआधी कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली आणि आर. वैषाली यांनी ही कामगिरी केली आहे.

          

१९ वर्षांची ही विश्व कनिष्ठ विजेती खेळाडू गेल्या ३४ वर्षांत महिला कॅन्डिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणारी पहिली किशोरवयीन ठरली आहे. वर्ल्ड चेस चॅम्पियन फायनलमध्ये दोन्ही कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख  या अंतिम लढतीत दोन्ही खेळाडू भारताच्याच होत्या. स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताच्याच कोनेरू हंपीने विजय मिळवला होता. त्यामुळे भारतातच हा वर्ल्ड कप येणार हे निश्चित होतं. मात्र दोघी पैकी या वर्ल्ड कपवर कोण नाव कोरणार? याची उत्सूकता होती. मात्र दिव्याने चाल खेळत कोनेरुला पराभवाची धुळ चारली. विजय मिळवताच दिव्याच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले. तर दुसऱ्या बाजूला कोनेरु हंपीला अंतिम फेरीत येऊन पराभूत झाल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. दिव्या देशमुख एक महिला ग्रँडमास्टर आणि आंतरराष्ट्रीय मास्टर आहे. वर्ल्ड चॅम्पियन घोषित होताच तिने आईला आनंद व्यक्त करत मिठी दिली. 




              प्रधानमंत्री यांनी केलं अभिनंदन 

दोन उत्कृष्ट भारतीय बुद्धिबळपटूंचा समावेश असलेला ऐतिहासिक अंतिम सामना! तरुण दिव्या देशमुखला २०२५ मध्ये FIDE महिला जागतिक बुद्धिबळ विजेता झाल्याबद्दल अभिमान आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन, ज्यामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल. कोनेरू हम्पीने संपूर्ण स्पर्धेत प्रचंड पराक्रम दाखवला आहे. दोन्ही खेळाडूंना त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. 


         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा 

दिग्गज ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी, दोन पिढ्यांतील दोन बुद्धिबळ सम्राज्ञींची ही अकल्पनीय लढत, बुद्धिबळप्रेमींना आजन्म लक्षात राहील. दिव्याने भारताची 88वी ग्रँडमास्टर होण्याचा मान पटकावला आणि ती देशाची पहिली महिला ग्रँडमास्टर ठरली आहे, ही बाब देशाच्या बुद्धिबळ इतिहासात एक मैलाचा दगड ठरते. दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी, या दोघीही आजच्या आणि उद्याच्या पिढ्यांसाठी प्रेरणेचे जिवंत उदाहरण आहेत. या दोन्ही बुद्धिवंत सम्राज्ञींना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! असे म्हणत त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या