पुणे:-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे, नागपूर,अमरावती, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, लातूर व कोकण तर्फे घेण्यात येणारा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२वी) चे पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना निकाल मंगळवार दिनांक 29 जुलै या दिवशी ऑनलाइन बघता येईल.
24 जून २०२५ ते ०८ जुलै 2025 यादरम्यान दहावीची पुरवणी परीक्षा पार पडली होती. तर, २४ जून २०२५ ते १६ जुलै २०२५ ला बारावीची पुरवणी परीक्षा पार पडली होती. आता या पुरवणीचा निकाल जाहीर झाला असून, विद्यार्थी १० वी पुरवणी परीक्षेचा निकाल https://www.mahahsscboard.in व http://sscresult.mkcl.org या संकेतस्थळावर दहावी पुरवणीचा निकाल प्रसिध्द होईल. तर, १२ वी पुरवणी परीक्षेचा निकाल https://www.mahahsscboard.in व http://hscresult.mkcl.org या संकेतस्थळावर प्रसिध्द होईल.
१० वी आणि १२ वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी पासून विद्यार्थ्याला विद्यार्थ्यास स्वतःच्या आवश्यक विषयांपैकी (श्रेणी विषयां व्यतिरिक्त) कोणत्याही इतर विषयात मिळवलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन करण्यासाठी संबंधित विभागा कडे https://www.mahahsscboard.in या संकेतस्थळाला भेट देत अर्ज करू शकता. परंतु, गुणपडताळणी आणि छायाप्रती साठी ३०/०७/२०२५ ते ०८/०८/२०२५ यादरम्यान अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यासोबतच (Debit Card/ Credit Card/UPI/ Net Banking) याद्वारे ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरायचे आहेत. यासाठी अटी, शर्ती व सूचना आयोगा तर्फे लागू करण्यात आलेल्या आहेत.
"जून-जुलै २०२५ पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून, छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात, विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे", असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ म्हणतात
"जून-जुलै २०२५ च्या इ. १० वी व इ. १२ वी परीक्षेमध्ये सर्व विषयांसह प्रथम प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण सुधार करायचा आहे. अश्या विद्यार्थ्यांना तरतुदींच्या अधीन राहून तीन संधी मिळेल. फेब्रुवारी मार्च २०२६, जून-जुलै २०२६ व फेब्रुवारी-मार्च २०२७ अशी तीन संधी असेल", असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी जाहीर केले आहे.

0 टिप्पण्या