जम्मू :-
एप्रिल महिन्यात पहलगाम येथे हल्ला झाला होता. या हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून पाकिस्तान मधील आतंकवाद्यांचे अनेक कॅम्प उद्धवस्त करण्यात आले असे स्वतः सरकारचे प्रतिनिधी म्हणत होते. त्यादरम्यान "ऑपरेशन सींदूर" नावाचं ऑपरेशन भारत सरकारने पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या देशातील नागरिकांचे बदला घेण्यासाठी आणि पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी ठेवलं होतं. पाकिस्तानने देशाच्या सीमेवर गोळीबार आणि बॉम्ब टाकण्यास सुरुवात केली. भारताने सुद्धा पाकिस्तानच्या नागरिकांना टार्गेट न करता तेथील दशतवाद्यांना जश्यास तसे उत्तर दिले. पाकिस्तानने सीमे लगत पूंछ आणि इतर सिमे लगत खेड्या गावा मध्ये गोळीबारी केली होती. त्यामुळे अनेक लेकरांना त्यांच्या पालकांना मुकावे लागले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी मे महिन्यात पूंछ येथील नागरिकांना भेट दिली होती. आता त्यांनी पूंछ येथील 22 मुलांच शैक्षणिक खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
पूंछ मधील 22 मुलांना घेतले दत्तक
पूंछ मध्ये सीमे लगत पाकिस्तानी हल्ल्या मध्ये ज्या मुलांचे आई-वडील यांनी या जगाला कायमचा निरोप दिला त्या सर्व 22 मुलांचे शैक्षणिक खर्च उचलणार असल्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला असून, जम्मू आणि काश्मीर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कर्रा यांनी अशी माहिती दिली.
"लोकसत्ता" च्या रिपोर्ट नुसार ; " मुलं पदवीधर होईपर्यंत ही मदत सुरू राहणार असून, मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा पहिला हप्ता बुधवार ला ३० जुलै रोजी दिला जाणार आहे ". याच वर्षी राहुल गांधी यांनी मे महिन्यात जम्मू काश्मीर येथील पूंछ चा दौरा केला होता. त्यावेळेस त्यांनी स्थानिक पक्षातील कार्यकर्त्यांना आदेश दिला होता आणि आकडेवारी किती आहे याची माहिती घेण्यास सांगितली होती. त्यानंतर स्थानिक नेतृत्वाने कागदपत्रे गोळा करण्यास सुरुवात केली आणि यादी बनवून राहुल गांधी यांना सादर करण्यात आली.

0 टिप्पण्या