Hot Posts

6/recent/ticker-posts

"सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला" :- प्रकाश आंबेडकर

 

"राज्य शासनच सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी दोषी असल्याचा आंबेडकरांचा दावा"



दिल्ली:- 

    सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी सर्वोच्च न्यायालय कडून महत्वाचा निकाल देत, उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. उच्च न्यायालयाचा आदेश असताना, अद्याप गुन्हा दाखल का करण्यात आलेला नाही असा प्रश्न महायुती सरकारला सुप्रीम कोर्टाने विचारला? मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 7 दिवसांत गुन्हा दाखल करण्याचा आदेश असताना गुन्हा दाखल झाला नाही. आता कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केल्या प्रकरणी न्यायालय पोलिसांच्या विरोधात कारवाई करणार का हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख व ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर माध्यमांशी संवाद साधत असताना म्हणाले. 




                   हा तर हात झटकण्याचा भाग

राज्य शासनाने नेहमी प्रमाणे हात झटकन्याचा प्रयत्न केला ही बाब आम्ही कोर्टाला लक्षात आणून दिली असून, उच्च न्यायालय एक नियमावली तयार करू शकतो. ज्यामुळे आजपर्यंत कोठडीत असताना ज्यांचा मृत्यू झाला त्या सर्वांना न्याय मिळायला सुरुवात होईल. 


             जे जे च्या डॉक्टर्सना आरोपी करणार

     कोर्टाचा निर्देश असल्या शिवाय, दुसऱ्यांचे मत घेता येत नाही. दुसऱ्यांचे मत देताना सर्वांचे मत तपासून घेतले नसून आम्ही जे जे चे डॉक्टर्स यामध्ये समावेश आहेत. त्यांच्या विरोधात आम्ही कोर्टा मध्ये अर्ज करणार आहोत. 


   १९६ बी एन एस एस आणि जुना CRPC कायदा अपूर्ण

  आम्ही १९६ बी एन एस एस आणि जुना 174 चा CRPC कायदा अपूर्ण असल्याचा उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आणि उच्च न्यायलयाने ही कबूल केले. हाई कोर्ट त्याच्यावर लवकरच मार्गदर्शक तत्वे ठरवणार आहे. कोर्ट या प्रकरणाची चौकशी एस आय टी किवा आयोग तर्फे चौकशी करायची हे सुद्धा ठरवणार. नेमलेल्या आयोग कीवा एस आय टी वर नियंत्रण कुणी ठेवायचं हा प्रश्न न्यायालय समोर असणार आहे. तो प्रश्न संपला की प्रकरणाची चौकशी सुरु होईल. 

                        

                  कम्बिंग ऑपरेशन ची नोंद घेतली

कंबींग ऑपरेशन करण्या मागे काय कारण होतं आणि कुठल्या कायद्या अंतर्गत केलं हा चौकशीचा एक भाग होणार असून, कंबिग ऑपरेशन ज्यांनी घडवली ते कदाचित आरोपी सुद्धा होऊ शकतात. 


                   राज्य शासनच आरोपी 

        सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीतील मृत्यू राज्य शासनाच्या ताब्यात असताना झालेली आहे. राज्य शासनाने हात झटकण्याचा प्रयत्न या प्रकरणात केलेला असून, ही बाब आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेली असून,  आता उच्च न्यायालयाला नियम तयार करावे लागेल. एकदा नियम उच्च न्यायलयाने तयार केले की ज्यांना आजतागायत कोठडीतील मृत्यू प्रकरणी न्याय मिळालेला नाही. त्या सर्वांना न्याय मिळायला सुरुवात होते. 


         सर्वोच्च न्यायालयात खुद्द वंचित बहुजन आघाडी चे प्रमुख आणि ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर, प्रतीक बोंबार्डे आणि कीर्ती आनंद यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाजूने भूमिका मांडली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या