"७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर" "श्यामची आई चित्रपट ठरला मानकरी

नवी दिल्ली:- 


चित्रपट सृष्टी साठी सर्वोत्तम मानला जाणारा प्रतिष्ठित ७१ वा राष्ट्रिय चित्रपट पुरस्काराची घोषणा "राष्ट्रीय मीडिया केंद्र" नवी दिल्ली येथे करण्यात आली आहे. शुक्रवारला पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. मराठी सिने सृष्टी विभागातील 2023 मध्ये प्रदर्शित झालेला "श्यामची आई" या चित्रपटाला सर्वोच्च पुरस्कार मिळाला असून, नाळ २ ला सर्वोत्कृष्ट लहान मुलांचा सिनेमा, बॉलीवूड मध्ये शाहरुख खान यांना "जवान" चित्रपटात मुख्य भूमिकेत उत्कृष्ट कामगिरी बजावण्या करिता जाहीर झाला आहे, तर "12th फेल" करिता विक्रांत मेस्सी यांना जाहीर झाला आहे. 





           राणी मुखर्जी यांना "Mrs चॅटर्जी v/s नॉर्वे या चित्रपटासाठी उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल जाहीर जाहीर झाला असून, केरळ स्टोरी या चित्रपटासाठी सुदिप्तो सेन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, मुठुपेत्ताई सोमु भासका यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता, जानकी बोडीवाला आणि उर्वशी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, रॉकी और राणी की प्रेम कहाणी साठी मनोरंजनासाठी सर्वोत्तम लोकप्रिय चित्रपट, कथाल साठी सर्वोत्तम हिंदी चित्रपट, उल्लाझुक्कू ला सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट, पार्किंग ला सर्वोत्तम तमिळ चित्रपट आणि भगवंत केसरी ला सर्वोत्कृष्ट तेलुगु चित्रपट जाहीर झाला आहे. 

द इंडियन एक्स्प्रेस वृत्तानुसार, "या पुरस्कारांसाठी, १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान CBFC (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) कडून प्रमाणपत्र मिळालेले चित्रपट पात्र होते". 

       एनडीटीव्ही च्या इंस्टाग्रॅम पोस्ट नुसार बॉलीवूड सृष्टीचे किंग खान ऊर्फ शाहरुख खान यांनी 33 वर्षात पहिल्यांदाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला आहे. त्यांना अनेकदा आयआयएफए, फिल्मफेअर आणि इतर पुरस्कार आता पर्यंत मिळाले असून, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पहिल्यांदाच मिळत आहे. 

श्यामची आई चित्रपटाचे दिग्दर्शक सुजय डहाके असून, चित्रपटात ओम भुटकर , मयूर मोरे, संदीप पाठक , सारंग सथ्ये, उर्मिला जगताप, दिशा काटकर, गांधार जोशी, अनिकेत सागवेकर और ज्योति चांडेकर यांनी भूमिका बजावली. 

           

      

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने