नवी दिल्ली:-
केंद्रीय निवडणूक आयोग तर्फे उप-राष्ट्रपती पदाच्या निवडणुकी ची घोषणा करण्यात आली आहे. 9 सप्टेंबर रोजी 17 व्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट आहे. तर उमेदवारी अर्ज छानण्याची तारीख २२ ऑगस्ट जाहीर करण्यात आली असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची २५ ऑगस्ट ठरवण्यात आली आहे. मतमोजणी 9 सप्टेंबर ला होणार आहे. उप राष्ट्रपती पद काही दिवसांपासून रिक्त झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिसूचना काढत याबद्दल माहिती दिली.
जगदीप धनखर यांनी दिला राजीनामा
देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदिप धणखड यांनी 21 जुलै रोजी आरोग्याचा कारण सांगत महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजीनामा सुपूर्द केला होता. त्यामुळे उप राष्ट्रपती पद खाली झालं होतं. धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे विरोधकांनी तर्क वितर्क लावण्याचे सुरू केले होते. उपराष्ट्रपती पेशाने वकील असून, उपराष्ट्रपती पदावर रुजू होण्या पूर्वी पश्चिम बंगाल राज्याचे राज्यपाल होते. जयदीप धनखड यांना राजीनामा द्यावा लागला की स्वतःहून दिला हा संभ्रम लोकांमध्ये कायम आहे.
उप राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोण मारणार बाजी?
उपराष्ट्रपती निवडणूकीत कोण मारणार बाजी हे एक कोडं असून, राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडी आणि इंडिया आघाडी दोघांनीही अद्यापही अधिकृत उमेदवार कोण असणार याबद्दल घोषणा केलेली नाही. जवळच बिहार विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत. बिहार मधील भाजपच्या आमदाराने मुख्यमंत्री नितीश कुमार यांना उप राष्ट्रपती करा असं विधान केलं. त्यामुळे बिहार चा उप राष्ट्रपती होणार असं चर्चांना उधाण आले होते.

0 टिप्पण्या