सोमनाथचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा केला जात होता. पण शवविच्छेदन अहवालातून त्याचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे उघड झाले.
परभणी:-
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सुर्यवंशी कुटुंब यांच्या करिता दिलासादायक बातमी समोर येत असून, उच्च न्यायालयाचा निर्वाळा सर्वोच्च न्यायलयाने कायम ठेवत आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचा निर्देश 30 जुलै रोजी दिला होता. त्यानुसार काल दिनांक 2 ऑगस्ट रोजी अनोळखी व्यक्ती विरोधात नवा मोंढा पोलीस स्टेशन, जिल्हा परभणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता 2023 कायद्या अंतर्गत कलम १०३ (०१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉम्बे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानुसार एका आठवड्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश होते. परंतु, 7 दिवस उलटल्या नंतरही गुन्हा पोलिसांकडून दाखल करण्यात आला नव्हता. याबाबत दिवं. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री विजयाबाई सूर्यवंशी यांनी अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायासाठी दाद मागितली. सोमनाथ सुर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता.
दिवं. सोमनाथ यांच्या आई विजयाबाई यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णया विरोधात आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु सुप्रीम कोर्टाने ३० जुलै रोजी औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला आणि कोण कोण या गुन्ह्यात सहभागी आहेत याची चौकशी करावी आणि मग नावे या गुन्ह्यात समाविष्ट करावीत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. आता प्रकरण "राज्य गुन्हा अन्वेषण विभाग", पुणे यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आलं आहे.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण काय?
परभणी येथे डिसेंबर 2024 ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या लगत संविधानाची विटंबना करत असताना एक इसम आढळला. दिव्य मराठी वृत्ता नुसार, त्या विटंबना मुळे परभणी शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. शहरात सर्वत्र हिंसाचार उसळला होता. आंदोलकांनी वाहनांची प्रचंड तोडफोड केली होती. पोलिसांनी कॉम्बिग ऑपरेशन चालवलेलं. या प्रकरणात त्यांनी अनेकांना अटक केली. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा सुद्धा समावेश होता. सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत परभणी पोलिस स्टेशनमध्ये मृत्यू झाला. प्रारंभी सोमनाथचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा दावा केला जात होता. पण पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये त्याचा मृत्यू मारहाणीत झाल्याचा स्पष्ट उल्लेख होता. पोलीस स्टेशन मध्ये मृत्यू झाल्याचे समजताच अनेक आंबेडकरी कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन बाहेरच जमण्यास सुरुवात केली.
प्रकरणात प्रकाश आंबेडकरांनी घातले स्वतः लक्ष
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची बातमी आल्या पासून स्वतः वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष घातले होते. उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात त्यांनी स्वतः काळा कोट चढवून, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाजूने युक्तिवाद केला. उच्च न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद लक्षात घेता, सूर्यवंशी कुटुंबाच्या बाजूने निर्णय दिला. परंतु, ७ दिवसांच्या अवधी नंतर गुन्हे दाखल झाले नाही म्हणून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री यांनी वृत्त वाहिनी च्या मुलाखती मध्ये टाहो फोडला. त्यानंतर आरोपी सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्ट ने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
"सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला कायम ठेवत शहिद सोमनाथ सूर्यवंशी हत्येप्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. या संदर्भात चौकशी समिती गठीत केली की, चौकशीला सुरुवात होईल", असे सुर्यवंशी कुटुंबाचे वकील प्रकाश आंबेडकर म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवताच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री यांचे रडू थांबत नव्हते. त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचे कौतुक करत म्हणाले की,"प्रकाश आंबेडकरच माझ्या भावा प्रमाणे सोबत राहिले.

0 टिप्पण्या