झारखंड राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. झारखंड राज्य एकेकाळी बिहार चा भाग होता. झारखंड राज्याच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका शिबू सोरेन यांची होती.
दिल्ली:-
झारखंड चे पूर्व मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार शिबू सोरेन यांनी वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांची एक संपूर्ण टीम त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत असताना, दिल्लीच्या गंगाराम दवाखान्यात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते किडणी शी संबंधीत आजाराने ते ग्रस्त होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण झारखंड राज्यात शोककळा पसरली आहे. समस्त झारखंड राज्याची जनता "दिशोम गुरुजी" म्हणून ओळखते. हिंदुस्तान न्यूज वेबसाईट वृत्तानुसार, "शिबू सोरेन यांच निधन आज सकाळी ८:५६ वाजता झालं". निधनाची बातमी त्यांचा मुलगा झारखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सर्वात आधी समाज माध्यमांमध्ये "आदरणीय दिशोम गुरुजी हम सभी को छोड़कर चले गए हैं। आज मैं शून्य हो गया हूँ..." अशी पोस्ट लिहत जाहीर केली. निधन होण्या पूर्वी हेमंत सोरेन दवाखान्यातच उपस्थित होते.
जनसत्ता च्या रिपोर्ट नुसार, गंगाराम दवाखान्या तर्फे शिबू सोरेन यांच्या निधना नंतर केलेल्या वक्तव्यात म्हणाले की, "किडनी च्या आजाराने ग्रस्त होते आणि दीड महिन्या अगोदर ब्रेन स्ट्रोक झाला होता.। मागील एक महिन्यांपासून ते लाइफ सपोर्ट सिस्टिम वर होते.
कशी झाली राजकारणाची सुरुवात ?
शाळेत शिकत असतानाच त्यांच्या वडिलांचा खून करण्यात आला होता. वयाच्या 18 व्या वर्षी संथल नवयुवक संघ नावाचे संघटन त्यांनी स्थापन केली. बंगाली मार्क्सिस्ट ट्रेड युनियन चे नेते ए. के. रॉय, कुर्मी महतो नेते विनोद बिहारी महतो आणि शिबू सोरेन यांच्यासह त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चा संघटनेची स्थापना केली. शिबू सोरेन त्यानंतर सरचिटणीस या पदावर त्यांची निवड झाली होती.
१९७७ मध्ये त्यांचा पहिला लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. १९८० मध्ये ते पहिल्यांदा दुमका येथून लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर ते १९८९, १९९१ आणि १९९६ मध्येही लोकसभा खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात कोळसा मंत्री म्हणून मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात काम केले . परंतु, 30 वर्ष जुन्या चिरुदिह प्रकरणामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. सध्या ते राज्यसभा खासदार आहेत.
स्वतःच भरवली होती न्यायालय
शिबू सोरेन हे जमीनदार आणि सावकारांविरुद्ध न्याय देण्यासाठी ओळखले जात होते , कधी कधी ते स्वतःचे न्यायालयेही भरवत असत. झामुमो ने आदिवासींच्या जमिनी परत मिळवण्यासाठी आंदोलने केली. त्यांनी जबरदस्तीने जमिनी हडपण्यास सुरुवात केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे सुनील सोरेन यांचा दुमका मतदारसंघातून पराभव केला होता.
शिबू सोरेन यांच्या पत्नीचे नाव रूपी किस्कु आहे. तर, त्यांना 3 मुलं आणि १ मुलगी आहे. दुर्गा सोरेन, हेमंत सोरेन आणि बसंत सोरेन असे मुलांचे नाव आहे. तर, मुलीचे नाव अंजली सोरेन आहे. त्यांचा मुलगा हेमंत सोरेन सध्याचे झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.
राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी वाहिली पर्थिवला आदरांजली
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वर पोस्ट "झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन जी यांना भावनिक श्रद्धांजली वाहिली. या दुःखाच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांना भेटून माझ्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. त्यांचे संपूर्ण आयुष्य आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी समर्पित होते, ज्यासाठी ते नेहमीच लक्षात राहतील" अशी पोस्ट लिहत आदरांजली वाहिली. यासोबतच त्यांनी दवाखान्यात पार्थिवाला भेट दिली आणि श्रद्धांजली वाहिली.
तर राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी दिल्ली मध्ये निधन झालेल्या दवाखान्यात भेट देऊन शीबू सोरेन यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहिली व सोरेन कुटुंबीयांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी सांत्वन केले.




0 टिप्पण्या