Hot Posts

6/recent/ticker-posts

" सत्यपाल मलिक यांनी घेतला शेवटचा श्वास", "जम्मू काश्मीर चे 10 वे राज्यपाल म्हणून पाहिले होते काम"

 



जम्मू काश्मीर, मेघालय, ओडिसा, मेघालय आणि बिहार चे माजी राज्यपाल तथा उत्तर प्रदेश चे राज्यसभा खासदार म्हणून काम पाहिले. 




नवी दिल्ली :- 

     जम्मू कश्मीर कश्मीर चे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जगाचा निरोप घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी राम मनोहर लोहिया दवाखान्यात शेवटचा श्वास घेतला. किडनीशी संबंधित आजार असल्याने त्यांचा उपचार राम मनोहर लोहिया दवाखान्यात सुरू होता. उपचारा दरम्यान त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. सत्यपाल मलिक यांच्या निधनाची बातमी त्यांच्या एक्स अकाउंट वरून देण्यात आली. 





                  राजकीय जीवनाची सुरुवात 

सत्यपाल मलिक यांचा जन्म हीसवाडा गावी मेरठ जिल्हा येथे झाला. मिरज जिल्ह्याला आता बागपत जिल्हा म्हणून ओळखले जाते. बॅचलर ऑफ लॉ या विषयात त्यांनी मेरठ विद्यापीठातून डिग्री मिळवली. १९६८ ते १९६९ मध्ये त्यांनी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपदी काम केले. इथूनच त्यांच्या राजकीय जीवनाचा प्रवास सुरू झाला होता. चरण सिंग यांच्या भारतीय क्रांती दलाचे सदस्य म्हणून निवडणूक यशस्वीरित्या लढवल्यानंतर मलिक बागपत येथून विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यांनी ४२.४% मते मिळवत निवडणूक जिंकली आणि त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आचार्य दीपंकर यांना पराभूत केले. ज्यांना एकूण मतांपैकी ३१.६% मते मिळाली.

        1980 ते 1989 या दरम्यान राज्यसभा खासदार म्हणून कार्यरत होते. उत्तर प्रदेशचे प्रतिनिधी खासदार होते. 1989 ते 91 या दरम्यान अलीगड मतदारसंघ जनता दलाच्या तिकिटावर काबीज केला होता. २०१२ साली त्यांची नियुक्ती भाजपच्या उप राष्ट्रीय अध्यक्ष पदी करण्यात आली होती. ५ राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिलं. 1987 ला राजीव गांधी यांच्या वर बोफ़ोर्स घोटाळ्या चा आरोप होता , त्याविरोधात विश्वनाथ प्रताप सिंह यांनी आवाज उठवला आणि सत्यपाल मलिक यांनी त्यांना सहकार्य केलं. कांग्रेस ला सोडून सत्यपाल मलिक यांनी जन मोर्चा पार्टी स्थापन केली. 1988 साली जन मोर्चा पार्टी विलगिकरण जनता दल मध्ये केली.

  

         जम्मू काश्मीर चे राज्यपाल म्हणून काम 

जम्मू काश्मीर चे राज्यपाल पदी कार्यरत असताना पुलवामा येथे सैनिकांवर हल्ला झाला होता. जम्मू काश्मीरचे दहावे आणि शेवटचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यावेळी त्यांनी सरकारवर गंभीर आरोपही केले होते. जम्मू काश्मीर सह मेघालय, ओडिसा, गोवा आणि बिहार या राज्याचे राज्यपाल पदी त्यांनी काम केले आहे.


                नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली 

"श्री सत्यपाल मलिक जी यांच्या निधनाने दुःख झाले. या दुःखाच्या वेळी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आणि समर्थकांसोबत आहेत. ओम शांती." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वर पोस्ट लिहित वाहिली आदरांजली. 


          



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या