MIM नगरसेविका सहर शेख हिचा माफीनामा! म्हणाली, "तिरंग्या साठीच जगू आणि तिरंग्यासाठीच मरू"

 


MIM नगरसेवक सहर शेख हिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी तिने पोलिसां कडे माफीनामा सादर केला. माझा हेतू कुणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता असे तिने माफीनाम्यात सांगितले. 



MIM Corporator Sahar Sheikh Apology  :- 


    नवनिर्वाचित MIM च्या नगरसेविका सहर शेख कथित वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी माफी मागितली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कडून पोलिसांत तक्रार दाखल केल्या नंतर सहर शेख यांनी पोलिसांना लेखी माफीनामा सादर केला. त्यामध्ये तिने "तिरंग्यासाठीच जगू आणि मरू" असे ती म्हणाली. 



    





                   नेमकं काय म्हणाली शेख? 


"माझा हेतू कुणाचाही मन दुखावण्याचा किंवा वातावरण खराब करण्याचा नव्हता. आम्ही तिरंग्यासाठीच जगू आणि तिरंग्या साठीच मरू. माझ्या कथित वक्तव्यामुळे कुणाचेही मन दुखावलेले असेल तर मी माफी मागते", असे ती माफिनाम्यात म्हणाली. 

या प्रकरणावर प्रसार माध्यमांना स्पष्टीकरण देत असताना, ती म्हणाली होती. की, "माझ्या पक्षाचा रंग हिरवा आहे. जर माझ्या पक्षाचा रंग दुसऱ्या कुठल्या रंगाचा असता तर, मी त्या रंगाने मुंब्रा शहराला रंगवण्याचे आवाहन केले असते".

     भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक्स अधिकृत अकाऊंट वर पोस्ट करत माहिती शेअर केली. 

         नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख हिने एका वादग्रस्त विधानात मुंब्रा शहर ला हिरव्या रंगाने रंगवून टाका असे ती म्हणाली होती. त्यावरून देशभरात चांगलाच विरोध झाला. त्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर तिला पोलिसां मार्फत नोटीस पाठवण्यात आली. 


       पोलिसां तर्फे पाठवलेल्या नोटीसला जवाब देत असताना तिने पोलिसांना लेखी माफीनामा लिहून दिलेला असून, भाजप नेते किरीट सोमय्या या माफीनामा मुळे समाधानी आहेत. या प्रकरणात कारवाई करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी सुद्धा लेखी निवेदन दिले होते. 

      

          राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक लढण्या करिता तिकीट नाही दिले. असा आरोप तिचे वडील युनुस शेख यांनी केला. यानंतर MIM कडून निवडणूक लढवली. निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर तिने कैसा हराया? म्हणत संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगवून टाकू असा उमेदवारी न दिल्याने शाब्दिक हल्ला केला. त्यामुळे व्हिडिओ व्हायरल झाला. 

          


          




        


             


           

         

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या