वकील असिम सरोदेंचा दावा, "शिंदे सेनेतील अनेकजण उद्धव ठाकरेंकडे परततील",



मागील तीन वर्षापासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हा संबंधित प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालय मध्ये सुनावणी होणार आहे. 



Shivsena Party Symbol Dispute :- 


शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले होते. आयोगाच्या निर्णया विरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता त्याची सुनावणी उद्या (२१ जानेवारीला) होणार आहे, अशी माहिती वकील असिम सरोदे यांनी दिली आहे.








      मागील तीन वर्षापासून सतत सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना यांचा पक्षफुटीनंतर निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हा वरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात अद्याप सुरू आहे. 


               ठाकरे बंधू राजकारण फिरवू शकतील 


"उद्या निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर सुनावणी होणार असून, सर्वोच्च न्यायालयाने जर पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या कडून काढून घेतले. तर, एकनाथ शिंदे यांच्याकडील सर्व आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जातील आणि उद्धव ठाकरेंची सेना अजून मजबूत होईल. सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला तर, ठाकरे बंधूं मुंबई महानगर पालिकेतील राजकारण फिरवू शकतील",असेही सरोदे म्हणाले. 

           


            शिंदे सेनेचे होणार भाजप विलीनीकरण


     "एकनाथ शिंदे यांची सेना भाजपमध्ये विलीन होणार असून, एकनाथ शिंदे यांचा राजकीय महत्त्व एकदम कमी होणार आहे", असा अंदाज वकील सरोदेंनी वर्तवला. 


 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या