Hot Posts

6/recent/ticker-posts

तब्बल १२७ वर्षानंतर मायदेशी परतले बुद्ध धातू" "केंद्र सरकारने केला होता निलामी विरोधात हस्तक्षेप"






   नवी दिल्ली:- 

     उत्तर प्रदेश च्या पिपरहवा स्तूप च्या उत्खनन मध्ये 1898 ला सापडलेले भगवान बुद्धांचे पवित्र अस्थिकलश १२७ वर्षानंतर ब्रिटेन मधून देशात पोहचले आहेत. भारतात इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. त्यादरम्यान उत्खनन मध्ये भगवान बुद्धांचे अवशेष सापडले होते. ते अवशेष 1898 मध्ये ब्रिटेन परत घेऊन गेले आता सरकारने ते वापस मागवले असून, देशात पोहचले आहेत. भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष पिपरहवा येथील मंदिरात स्थापना केली आहे. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह यांनी अस्थि देशात पोहचताच दिल्ली विमानतळावर स्वागत करत, बुद्ध धातूंचे भिक्षुंसह पहिल्यांदा दर्शन घेतले. 

       

 केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत बुद्ध धातूंचे स्वागत करताना


                       पिपरहवा स्तूपचा ईतिहास 

     उत्तर प्रदेश येथील सिद्धार्थ नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध पिपरहवा गावात प्राचीन बौद्धकालीन स्तूप होते. ब्रिटिश लोकांचं देशात राज्य असल्या कारणानं त्यावेळेस इंग्रज जमीनदार विल्यम पेपे यांनी स्तूपच्या ठिकाणी उत्खनन केले. स्तुपला 18 फूट खोल छेद केल्यावर वालुकाश्माची पेटी सापडली. या पेटीत त्यांना 5 अस्थिकलश दिसले. त्यामध्ये त्यांना झाकण आणि एक दगडी पेटी दिसली. यात अस्थी आणि सोन्याचे लहान दागिने, ओवण्यासाठी गड्डे असलेली फुले आणि मूल्यवान मणी सापडले. यांपैकी एका कलशावर सदतीस अक्षरांचा ब्राह्मी लेख कोरलेला आहे. पेपे याने दगडी पेटीमधील सर्व वस्तूंचे, अस्थी आणि हाडे व इतर मूल्यवान वस्तू असे वर्गीकरण केले. अशोक काळातील बौद्ध परंपरेनुसार इ. स. पू. तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने कोलीय वगळता उर्वरित स्तूपांमधून अस्थी गोळा करून त्यांचे भारतभर वाटप करून नव्याने स्तूपांची स्थापना केली. पेपेने उत्खनन केलेल्या स्तूपाच्या परिसरात अनेक अशोकस्तंभ आढळतात. लोकसत्ता वृत्तानुसार,  या स्तूपात सापडलेल्या अवशेषांमध्ये गौतम बुद्धांच्या दहनानंतरचे शरीरधातू आणि काही रत्नं सापडली होती. पेप्पे यांनी ही रत्न, बुद्धधातू (अस्थी) आणि त्यांचे पात्र ब्रिटिश भारतातील वसाहती सरकारकडे सुपूर्त केले. यानंतर अस्थि पात्रातील काही भाग श्रीलंका, म्यानमार आणि थाईलांड बौद्ध देशांना देण्यात आला. काही भाग पेप्पे यांना ठेवण्याची परवानगी देण्यात आली.


                सोथिबिज कंपनी करणार होती लिलाव 

सोथिबिज ही प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय लिलाव कंपनी उत्तर प्रदेशातील पिप्रावा येथे १८९० च्या दशकात सापडलेल्या या मौल्यवान रत्नांचा लिलाव हाँगकाँग येथे करणार होती. या रत्नांचा शोध लागल्यापासून ते ब्रिटनमधील एका खाजगी संग्रहात होते. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, विल्यम क्लॅक्सटन पेप्पे यांचे पणतू क्रिस पेप्पे यांनी सांगितले की, ही रत्नं त्यांच्या आजोबांकडून चुलत भावाकडे गेली होती. २०१३ साली त्यांनी आणि त्यांच्या दोन चुलत भावंडांनी ही रत्नं मिळवली. त्यानंतर अनेकदा हे मौल्यवान रत्न प्रदर्शन करिता ठेवण्यात आले होते. रत्नांची अंदाजे किंमत हॉंगकाँग डॉलर १०० दशलक्ष (भारतीय रुपयात सुमारे १०८.७७ कोटी रुपये) इतकी आहे अशी द गार्डियन वृत्तानुसार माहिती मिळत आहे. भारतातून हा लीलाव रोखण्या करिता अनेकांनी प्रयत्न केले. विशेषतः महाराष्ट्रातून वंचित बहुजन आघाडी चे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे बंधू  व भारतीय बौद्ध महासभा चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी केंद्र सरकारला पत्र लिहत लिलाव थांबवण्याची विनंती केली होती. 

          बीबीसी च्या रिपोर्ट नुसार, लिलाव घर सोथेबिज यांनी तब्बल १२७ वर्षानंतर भगवान बुद्धांचे पवित्र अस्थिकलश भारताकडे सुपूर्द केले आहे. जागतिक बौद्ध नेते आणि भारत सरकार यांच्या दबावा खाली हा निर्णय त्यांनी घेतला असल्याचे बोलले जात आहे. बुधवारला अस्थिकलश भारतात पोहचला. 



               पंतप्रधान यांनी केला आनंद व्यक्त 

"आपल्या सांस्कृतिक वारशासाठी एक आनंदाचा दिवस! भगवान बुद्धांचे पवित्र पिप्रहवा अवशेष १२७ वर्षांनंतर घरी परतले आहेत याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. हे पवित्र अवशेष भगवान बुद्धांशी आणि त्यांच्या उदात्त शिकवणींशी भारताचे जवळचे नाते अधोरेखित करतात. आपल्या गौरवशाली संस्कृतीच्या विविध पैलूंचे जतन आणि संरक्षण करण्यासाठीची आपली वचनबद्धता देखील दर्शवितात", असे एक्स वर पंतप्रधान नरेंद्र मोदी आनंद व्यक्त करत म्हणाले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या