Hot Posts

6/recent/ticker-posts

"सोनू सूद होणार ५०० आई वडिलांचा मुलगा", "500 वृद्धांसाठी बांधणार वृद्धाश्रम"



मुंबई:- 

लोकांची मदत करण्यासाठी नेहमी चर्चेत असणारे सिने अभिनेते सोनू सूद आता 500 म्हातारे आई वडील यांच्या मदती करिता वृद्धाश्रमाची निर्मिती करणार आहेत. स्वतःच्या पोटी जन्म मुलांना देऊनही लग्न झाल्या नंतर आई वडिलांना दूर सोडतात किंवा बेघर करतात अश्या लोकांसाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. चित्रपट सृष्टी साठी ते विलेन असतीलही कदाचित, परंतु त्यांनी हा निर्णय घेऊन वास्तविक जगातील हिरो असल्याचे अनेकदा त्यांनी त्यांच्या कामातून दाखवून दिले आहे. 

         



   कोरोना काळात सिने अभिनेते सोनू सूद यांनी मुंबई मध्ये राहणाऱ्या उत्तर भारतीय लोकांना सुरक्षित घरी पोहचवण्याची व्यवस्था केली होती. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले होते. टीवी 9 भारतवर्ष वृत्त नुसार, सोनू सूद यांनी बुधवार ला 52 वा वाढदिवस साजरा केला आणि त्याच क्षणी त्यांनी याबद्दल खुलासा केला. 

500 म्हातारे आई वडील यांना वृद्धाश्रम सह त्यांची काळजी घेण्याची जबबदारी सुद्धा त्यांच्या वृद्धाश्रम मार्फत घेण्यात येईल आणि राहण्याच्या ठिकाणी आरोग्याशी संबंधित सेवा आणि उत्तम आहार यांचा समावेश आहे. असा त्यांचा मानस आहे असं सांगण्यात येत आहे. 

                    गरजुंच्या मदती करिता नेहमी तयार

सिने अभिनेते सोनू सूद एक्स वर ते नेहमी सक्रिय असून, गरजूंना लागणाऱ्या मदतीसाठी घोषणा करत असतात. शिर्डीतील दोन अंध जोडप्यांना घर बांधून दिलं. आणि त्यानंतर त्या दोन अंध जोडप्यांनी घराचं नाव "सोनू सूद का घर" असं घराचं नाव ठेवलं. जोडप्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. सोनू सूद यांनी एक्स वर त्यांना सांगत असताना " अगली बार शिर्डी आया तो घर आऊंगा" असे अंध दाम्पत्यांना म्हणाले. 

          एक व्हिडिओ शेतकऱ्याचा व्हायरल झाला होता. शेतकरी दाम्पत्य बैला ऐवजी स्वतः शेतात राबत असताना शेत स्वतः नांगरत होते. तेव्हा माहिती होताच त्यांनी त्यांना बैल पाठवले आणि एक्स वर पोस्ट करत म्हणाले " आप नंबर भेजो, बैल हम भेजते है". 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या