Hot Posts

6/recent/ticker-posts

"यंदा आनंदाचा शिधा वाटप नाहीच" :- मंत्री छगन भुजबळ "४५००० कोटींचा फटका बसल्याची चर्चा"






आनंदाचा शिधा:- 

महाराष्ट्र सरकार तर्फे गणेशोत्सवात आणि दिवाळीत दिला जाणारा आनंदाचा शिधा हा यंदा दुःखाचं कारण ठरणार आहे. महायुती सरकारने राबवलेल्या "लाडकी बहीण योजनेचा" फटका आनंदाचा शिधा योजनेला बसल्याचे बोलले जात आहे. यातच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री यांनी भाष्य केलं.

"दरवर्षी दिवाळी आणि गणेशोत्सवात दिला जाणारा आनंदाचा शिधा यंदा मिळणार नसून, सरकारी तिजोरीवर 45 हजार कोटींचा ताण पडत आहे, त्यामुळे यंदा आनंदाचा शिधा मिळणार नाही याची कबुली खुद्द अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांना दिली. 




     आनंदाचा शिधा द्यायला तीन ते चार महिन्यापूर्वी तयारी करावी लागते. आता गणपतीचा उत्सव असून, एक महिना सुद्धा गणपतीच्या उत्सवाला शिल्लक राहिलेला नाही. पैसे मंजूर जरी झाले तरी टेंडर काढावे लागतात, सध्या ते शक्य नसून, आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचे जाहीर केले. 

        राज्याच्या तिजोरीतून दोन किंवा चार हजार कोटी पर्यंत विभाग जमवू शकतो. परंतु 45 हजार कोटी अचानक जर कमी होणार असतील तर इतर योजनांवर त्याच्या थोडा थोडा परिणाम होणार असल्याचा खुलासा त्यांनी केला. सरकारच्या तिजोरीतील उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न सुरू असून, परिस्थिती पूर्ववत होईल आणि कोणावरही अन्याय होणार नाही असा संकेत त्यांनी दिला. 

            आनंदाचा शिधा योजना आहे तरी काय?

        एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आनंदाचा शिधा या योजनाची सुरुवात करण्यात आली होती. 2022 च्या दिवाळीला पहिल्यांदा आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. १ किलो चना डाळ, साखर आणि खाद्य तेल या तीन वस्तूंचा समावेश होता आणि फक्त शंभर रुपयात ह्या वस्तू लोकांना वितरित करण्यात आल्या होत्या. आता लाडकी बहीण योजने मुळे मोठ्या प्रमाणात सरकारच्या तिजोरीला फटका बसल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू असून, नाहक त्रास लोकांना ऐन सणासुदीच्या काळात लोकांना सहन करावं लागणार आहे. 

    महाराष्ट्र शासनाने "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना सुरु करण्यास २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मान्यता दिली होती. या योजनेत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या खात्यात टाकले जात आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या