ओला आणि उबेर यासारख्या खाजगी कंपन्या लोकांकडून भरमसाठ पैसे घेऊन नफा कमवत असतात. त्याला टक्कर देण्यासाठी राज्य सरकारने स्वतःचा "यात्री ॲप" बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई:-
ओला आणि उबेर यासारख्या खाजगी यात्री कंपन्या लोकांकडून भरमसाठ पैसे घेऊन नफा कमवत असतात. त्यामुळे ग्राहकांना नाईलाजाने जास्त पैसे खाजगी यात्री ॲप ला द्यावे लागतात. खाजगी कंपन्या ग्राहकां कडून प्रचंड लूट करत असतात. हा विचार करून शासनाने लवकरच शासकीय यात्री ॲप बनवण्याचा निर्णय घेतला असून, हा ॲप लवकरच जनतेच्या सेवेत येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. शासनाच्या "यात्री ॲप" चे काम अंतिम टप्प्यात असल्याचा खुलासा त्यांनी केला.
मराठी तरुणांना मिळणार रोजगाराच्या संधी
ॲप शी संबंधित बैठकीत बोलतांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, "महाराष्ट्रातील मराठी तरुणांना या ॲप मुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहे. आतापर्यंत खाजगी कंपन्यांनी लोकांची लूट करून भरमसाठ नफा कमावला. त्यामुळे लोकांना खाजगी कंपन्यां च्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या छळातून मुक्त करण्याच्या प्रामाणिक हेतूने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रवासी ॲप बस, रिक्षा, टॅक्सी आणि ई-बस या वाहन सेवा उपलब्ध शासना मार्फत उपलब्ध असतील. भविष्यात एस.टी. महामंडळाला नवा स्त्रोत उत्पन्न करणे व प्रवाश्यांना एक विश्वासार्ह सेवा देणे हा या ॲप तयार करण्या मागे उद्देश आहे".
"छावा राईड" नावाचे येणार ॲप
सुरुवातीला या ॲप चे नाव काय असेल याबाबत मंत्रालयात विभागाची बैठक पार पडली. त्यामधे "जय महाराष्ट्र", "महा-राईड", "महा यात्री", "महा-गो छावा राईड" यापैकी एखादे नाव देण्या बाबत चर्चा झाली. नवीन शासकीय ॲप ला "छावा राईड ॲप" नाव देण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उप-मुख्यमंत्री यांच्या मान्यतेने हे ॲप लवकरच लोकांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात केंद्र व राज्य शासनाच्या समुच्चयक धोरणाच्या अंतर्गत राहून शासनाच्या यात्री ॲप बनवण्याच्या अंतिम मासुद्याच्या चर्चे वेळी त्यांनी सांगितले.
बेरोजगार युवकांना मिळणार कर्ज
बेरोजगार मराठी युवक युवतींना कर्ज देण्यासाठी मुंबै बँकेने पुढाकार घेतला असून, एस टी महामंडळ तर्फे संधी देण्यात येणाऱ्या युवक युवतींना मुंबई बँकेच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे. या युवक युवतींना वाहन खरेदी करण्यासाठी मुंबई बँकेच्या माध्यमातून १० टक्के व्याजदराने कर्ज दिले जाईल. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटके विमुक्त महामंडळ, ओबीसी महामंडळ आणि एमएसडीसी संस्थां तर्फे ११टक्के व्याज परतावा अनुदानाच्या स्वरूपात देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केला जाणार असून, हे कर्ज बिनव्याजी असल्याचे आमदार प्रवीण दरेकर यांनी बैठकीत सांगितले. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.



0 टिप्पण्या