Hot Posts

6/recent/ticker-posts

मंत्री संजय शिरसाठ यांच्या कडून आमदारांना २ कोटींचा निधी जाहीर




सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी विधानसभेच्या आमदारांना प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची घोषणा केली आहे. निधी वितरित झाल्याने दलित वस्त्यां मधील विकासकामांना गती मिळणार आहे, अशी घोषणा शिरसाठ यांनी केली. 





Minister Sanjay Shirsath Declares Fund For MLA :- 

 


दिवाळीच्या सणानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेच्या माध्यमातून विधानसभेच्या आमदारांना प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, आमदारांना वितरित करण्यात आला आहे, अशी घोषणा शिव सेना शिंदे गटाचे नेते व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या कडून करण्यात आली आहे. त्यामुळे आमदारां करिता ही आनंदाची बातमी आहे. 





Photo Source Sakal Media Company.




      

 सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून दलीत वस्त्यांमध्ये विविध प्रकारचे विकासकामे केली जातात. सदर योजना राज्यातील लोकप्रिय योजनां मधील एक योजना असून, आमदार, खासदार, मंत्री व इतर लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघातील सामाजिक विकासासाठी या योजनेतून निधी देण्यात येतो. 

        


  लोकप्रतिनिधींनी केली अनेकदा मागणी


काही महिन्यांपूर्वी लोकप्रतिनिधींनी संबंधित निधी बाबत मागणी केली होती. त्यामुळे, उपलब्ध निधी आणि केलेल्या मागणी मध्ये समतोल राखत, सामाजिक न्याय मंत्री श्री.शिरसाट यांनी आमदारांना दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे.  त्यामुळे निधी वितरित झाल्याने दलित वस्त्यांतील विकासकामांना गती मिळणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसाट यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या