Hot Posts

6/recent/ticker-posts

"वोट चोरी प्रकरणी हर्षवर्धन सपकाळ यांची भाजप सह निवडणुक आयोगवर टिका"

 


काँग्रेसचे नेते व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी धाराशिव जिल्ह्यातील पारंडा नगर परिषदेतील भाजप सह निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे. एक्स वर पोस्ट करत त्यांनी भाजप सह निवडणूक आयोगाला डिवचले आहे. 




Harshwardhan Sapkal Criticises BJP & ECI :- 



काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वोट चोरी प्रकरणी निवडणूक आयोगाला डिवचले असून, भाजप वर टिकास्त्र सोडले आहे. साम टिव्ही ची बातमी त्यांनी एक्स वर पोस्ट करत टीका केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील पारंडा नगर परिषदेतील घटना असल्याचे साम टिविने बातमी प्रसारित केली होती. त्याआधारे सपकाळांनी निशाणा साधला आहे. वोटेचोरी वरून त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. 

Photo Source Mid Day E-Paper Media.




धाराशिव जिल्ह्यातील पारंडा नगर परिषदेतील क्षेत्रात एकाच घरात ३७ बोगस मतदार असल्याचे वृत्त साम टीव्हीने दिले होते. त्यात पुन्हा मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे राजकिय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.




                    काय आहे प्रकरण?


परांडा नगर परिषद मधील क्षेत्रात एकाच घरात हिंदू, मुस्लीम, दलीत, माळी, ब्राम्हण या जातीचे एका घरात 40 बोगस मतदार आढळले असून, या यादीत उत्तर प्रदेश मधून आलेले पाच मजुरांचा देखील समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तर, ज्या घराचा हा पत्ता वापरण्यात आलेला आहे. ते घर शिवसेना शिंदे गटाचे माजी नगर सेवक यांचे असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अरबाज पठाण यांनी केलेला आहे. याप्रकरणी नगर परिषद कडे तक्रार दिली आहे, अशी माहिती अरबाज पठाण यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिली.



हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

याप्रकरणी हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया देताना ही लोकशाहीची थट्टा असल्याची टीका केली आणि निवडणूक आयोग झोपा काढत आहे का? असा खोचक प्रश्न त्यांनी निवडणूक आयोगाला विचारला. सत्ता मिळवण्यासाठी भाजप अजून किती हेराफेरी करणार आहे? व जनतेच्या मतावर डाका टाकूनच भाजपला सत्ता हवी आहे का? असा खोचक प्रश्न भाजपला केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या