Hot Posts

6/recent/ticker-posts

" राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर्फे परवानगी मागणाऱ्या अर्जावर विचार करण्याचे कर्नाटक उच्च न्यायालयाचे कर्नाटक सरकारला निर्देश "





कर्नाटक उच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला रा.स्व.सं. च्या वतीने करण्यात येणाऱ्या पथसंचालनाला परवानगी मागण्याच्या याचिकेवर विचार करण्याचे निर्देश दिले आहेत. 





 March :- 



कर्नाटक उच्च न्यायालयाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने परवानगी मागणाऱ्या याचिकेवर  विचार करण्याचे निर्देश कर्नाटक सरकारला दिले.  कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या २ नोव्हेंबर ला पार पडणाऱ्या पथसंचालन (Route March) करिता परवानगी मागणाऱ्या अर्जावर विचार करण्याचे निर्देश कर्नाटक सरकारला दिले आहे. न्यायाधीश एम जी शुकरे कमल यांनी हा निर्देश दिला. 













 न्यायमूर्ती एम जी शुकरे कमाल यांनी रविवार ला विशेष बैठक बोलावली. त्यानंतर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. याचिकाकर्त्याच्या अर्जावर त्यांनी केलेल्या कारवाई संबंधित अहवाल आणि मार्ग, ठिकाण आणि वेळ यासारख्या बाबींचा तपशीलवार अहवाल कर्नाटक सरकार आणि जिल्हा अधिकाऱ्यांना २४ ऑक्टोबर पर्यंत न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले.


 " याचिकेच्या गुणवत्तेवर अद्याप कुठलेच निर्णय दिलेले नसून, राज्याने सादर केलेल्या अहवाल वर विचार केल्यानंतरच निर्णय दिला जाणार ," असे  कर्नाटक उच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले.


आरएसएस च्या शताब्दी वर्षा निमित्त आणि विजयादशमी उत्सवाचा भाग म्हणून १९ ऑक्टोबर (आज) रोजी रूट मार्च काढण्याचे नियोजन केले होते. परंतु, परवानगी न मिळाल्याने संघाच्या वतीने कर्नाटक उच्च न्यायालय मध्ये याचिका दाखल करण्यात आली. 


 
भीम आर्मी आणि भारतीय दलित पँथर्स इतर संघटनांनी त्याच दिवशी आणि त्याच ठिकाणी रॅली काढण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कलबुर्गी प्रशासना समोर मोठा पेच निर्माण झाला. त्यामुळे प्रशासनाने परवानगी देणे टाळली. त्यानंतर याचिकाकर्त्याने कर्नाटक उच्च न्यायालय मध्ये धाव घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या