Hot Posts

6/recent/ticker-posts

" मॉडर्न कॉलेज प्रकरणी रोहित पवारांचा प्राचार्यांवर निशाणा ", " म्हणाले, संबंधित विद्यार्थ्याला छळण्याचा ...."

 


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील मॉडर्न कॉलेज वर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. मॉडर्न कॉलेज संबंधित युवकाला छळण्याचा प्रयत्न करत आहे का? असा सवाल आमदार रोहित पवारांनी केला आहे.




MLA Rohit Pawar Criticises Modern College :- 


पुण्यातील मॉडर्न कॉलेज मुळे माझी नौकरी गेली असा आरोप क्रीप्रेम बिऱ्हाडे या तरुणाने समाज माध्यमां वर केला होता. त्यामुळे त्याचा आरोप करणारा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्याप्रकरणी अनेकांनी तीव्र आक्षेप घेत मॉडर्न कॉलेज च्या प्राचार्यां विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. आता यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 







         रोहित पवार यांची प्रतिक्रिया 


पुण्याच्या मॉडर्न कॉलेजने कागदपत्रांची पडताळणी विद्यार्थ्याला वेळेत पूर्ण करून न दिल्याने त्याची नौकरी गेली. हा प्रकार योग्य नसून, ज्या मानसिकते मधून सरन्यायाधीशांवर हल्ला झाला. त्याच मानसिकतेतून प्रेम बिऱ्हाडे या युवकाला छळण्याचा प्रयत्न मॉडर्न कॉलेज प्रशासन करत आहे का? असा सवाल केला. तर, मनुवादी राजकारण थांबवावे अन्यथा कॉलेज प्रशासनाला हे परवडणार नाही असा इशारा आमदार रोहित पवारांनी दिला.

 




      

                    काय आहे प्रकरण ? 


"प्रेम बिऱ्हाडे हा तरुण पुण्यातील मॉडर्न कॉलेजचा माजी विद्यार्थी होता. त्याला लंडन मधील कंपनी मध्ये नौकरी लागली होती. त्यादरम्यान कंपनीने संबंधित विद्यार्थी हा तुमच्या कॉलेजचा आहे का असा प्रश्न कंपनीने कॉलेजला विचारला. त्यावर उत्तर देताना कॉलेज असे म्हणाले की, संबंधित विद्यार्थी कॉलेजचा विद्यार्थी नव्हता असं कंपनीला सांगितलं. त्यामुळे त्याला हातची नौकरी गमवावी लागली." असा आरोप संबंधित विद्यार्थ्यांचा आहे. 





     प्राचार्यांनी पत्रा द्वारे दिली प्रतिक्रिया


कॉलेजच्या प्राचार्यांनी संबंधित विद्यार्थ्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी दोन पानांचे पत्र समाज माध्यमांवर पोस्ट केले. त्यामध्ये असे लिहिले होते की, " संबंधित विद्यार्थी हा समाज माध्यमांवर महाविद्यालय आणि शिक्षकां बाबत चुकीचे आणि बदनामीकारक पोस्ट केल्याने महाविद्यालय, त्याचे कर्मचारी आणि प्राचार्य यांची प्रतिमा खराब करण्याचा  प्रयत्न आहे, असे मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य निवेदिता एकबोटे यांनी एक्स वरील पोस्ट केलेल्या पत्रात म्हटले. 

       " विद्यार्थ्याने माझ्या स्वाक्षरीने रोजगाराच्या उद्देशाने शिक्षण संदर्भ जारी करण्याची मागणी केली. शिक्षण घेत असताना त्याच्या असमाधानकारक वर्तन आणि शिस्तभंगाच्या नोंदी लक्षात घेऊन आणि संस्थात्मक धोरणानुसार, महाविद्यालयाने पुढील कोणतीही शिफारस किंवा संदर्भ पत्र जारी न करण्याचा निर्णय घेतला." असेही प्राचार्य निवेदिता एकबोटे म्हणाले.


   या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला होता व त्यांच्या विद्यार्थी संघटनेने कॉलेज बाहेर निदर्शने केली होती. या प्रकरणाचा अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांनी निषेध नोंदवला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या